निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार – रामदास आठवले.

मुंबई : श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे सोशल इंजिनिअरिंग निर्णायक भूमिका पार पाडू शकते पण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, त्यासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे आवश्यक आहे असा जुनाच सुर माजी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी परत आळवला आहे. एका वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी दिलखुलास गप्पा मारताना हे विचार मांडले.

‘प्रकाश आंबेडकर यांनी दलित, बौद्ध, अल्पसंख्याक व उपेक्षित घटकांना एकत्र करून राबवलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग चांगला असला तरी त्यातून अपेक्षित यश हाती लागत नाही. आम्ही वेगवेगळे लढून काही उपयोग नाही. तसे करून आमचा उमेदवार निवडून येत नाही. म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी समाजासाठी सकारात्मक विचार करून एकत्र येणे आवश्यक आहे’, असे मत व्यक्त केले. इतकेच नव्हे तर ‘आमचे ऐक्य होत असल्यास आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. त्यांना रिपाइं पक्षाचे अध्यक्षपद आणि प्रसंगी माझे मंत्रिपदही देण्याची माझी तयारी आहे’, अशा मनमोकळ्या भावनाही आठवले यांनी आवर्जून नमूद केल्या.

1990 मध्ये आमचा ऐक्याचा प्रयोग झाला होता. त्यावेळी युती करण्याबाबत आमचा जाहीरनामा मान्य करणाऱ्या काँग्रेस व जनता दल या दोघांपैकी एकाची निवड करताना झालेल्या मतदानात आमच्या सुकाणू समितीमधील ३३ जणांपैकी २३ जणांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला होता ही बाजूही त्यांनी स्पष्ट केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!