पेट्रोल पंपावरील होर्डिंग अंगावर पडल्याने 8 जणांचा मृत्यू. – घाटकोपर येथील दुर्घटना.
मुंबई : कांहीं दिवसांपासून वादळी वारे आणि पावसाचा तडाखा चालू आहे. हवामान खात्याने तश्या सूचनाही दिलेल्या आहेत. काल मात्र मुंबई शहर व परिसरात वादळाचा आणि अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. जोरदार वा-यामुळे अनेक भागात दुर्घटना घडल्या आहेत. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 80 जण जखमी झाले आहेत.
वादळी वाऱ्यासह जोराच्या पावसामुळे काल घाटकोपर पश्चिम येथील रमाबाई नंगर परिसरात भलामोठा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला. होर्डिंग अंगावर कोसळल्याने 100 हून अधिक लोकं अडकले होते. NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचाव कार्याला गती आली.
जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत