बुद्ध विहार हे केवळ पुजे साठी नसून चळवळीचे केंद्र व्हावे : आयु. अनिल वैद्य -निवृत्त न्यायाधीश

प्रतिनिधी वर्धा : वर्धा जिल्ह्यातील गाडेगाव येथील नालंदा विहारात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. या
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायाधीश अनिल वैद्य होते. ते आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात म्हणाले बौद्ध विहार हे आत्मसन्मान चळवळीचे केंद्र झाले पाहिजे. निव्वळ पूजा अर्चना करणे हा विहार निर्मितीचा हेतू नाही. म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विहारात सभागृह असावे म्हटले आहे.
विहार हे फक्त बौद्ध समाजाचे नसून ते तेली, माळी, कुणबी, ओबीसी या समस्त बहुजन समाजाचेही विहार आहे तेथे प्रबोधन झाले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचां राज्यभिषेक करण्यास का नकार दिला? महात्मा ज्योतिबा फुले यांना उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या वरातीतून का काढून दिले होते? यावर ओबीसी व बहुजन समाजासोबत विहारात विचारमंथन झाले पाहिजे. शिवाय तथागत बुद्ध हे महार एस.सी. होते हा गैरसमज सुद्धा दूर करण्याची गरज आहे हे सुध्दा माजी न्यायाधीश अनिल वैद्य म्हणाले. बौद्धांच्या आरक्षणाचां मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आरक्षणाची समाजाला आजही गरज असल्याचे त्यांनी सांगितले व बौद्धांना बौद्ध म्हणून सन्मानाने आरक्षण मिळावे हे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ राजरत्न आंबेडकर होते. त्यांनी बौद्धांना आर्थिक विकासासाठी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन केले व त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बँक स्थापन केली असून त्याचे शेअर विकत घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सेंट पॉल इन्स्टिट्युट नागपूर चे राजाभाऊ टाकसाळे होते. राजाभाऊ टाकसाळे यांनी
त्यांच्या संस्थेत जपानी भाषा शिकविणे सुरू केले असून जपान येथे ३० विद्यार्थी अभ्यास दौरा करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात हिंगणघाटचे शिक्षण महर्षी अनिल जवादे,भंते डॉ राजरत्न, धर्मपालजी ताकसांडे, डॉ सुभाष खंडारे, डॉ सिद्धार्थ बुटले, धनराज तेलंग, प्रीतम बुलकुंडे यांनीही उद्बबोधक विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल भगत यांनी तर सूत्रसंचालन सुनिल ढाले यांनी केले.
गडेगाव ता हिंगणघाट जी वर्धा येथे नालंदा बुद्ध विहारात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना साठी पंचक्रोशीतील मान्यवर प्रशांत जारोंडे, विनायक ताकसांडे, धिरज ताकसंडे, नीलध्वज कांबळे, आम्रपाली वाघमारे, कांताबाई वैद्य इत्यादी हजारो उपासक उपस्थित होते. प्रकाश पाटणकर याच्या
संगीत रजनीचा कार्यक्रम संपन्न झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत