संविधान वाचविण्यासाठी बहुजनांचा लढा उभा करावा लागेल- आयु. एस के भंडारे सर.

अँड प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस – स्वाभिमान दिन साजरा
मुंबई – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1949 साली देशाचे संविधान लिहिले त्यावेळी भारतीय स्वातंत्र्यात काहीही न केलेले मनुवादी विचाराच्या लोकांनी, संघटनानी संविधानास गोधडी म्हटले, ते एका अस्पृश्याने लिहिले, आणि तीन कलर असलेला राष्ट्रध्वज अशुभ आहे अशी संभावना केली. आता त्याच विचारसरणीचे लोक सत्तेत येऊन त्यांना संविधान बदलून धर्मावर आधारित असलेले संविधान पाहिजे, त्यात सर्वांना समानता नसणार म्हणजे आम्ही पुन्हा अस्पृश्य – गुलामीत जाणार अशी भीती समाजात पसरली असल्याने संविधान वाचविण्यासाठी आपल्याबरोबर बहुजनांचा लढा उभा करावा लागेल असे प्रतिपादन राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी भारतीय बौद्ध महासभा शाखा पूर्व मुंबई जिल्हा झोन क्र.५च्या वतीने महामानव विचार जयंती आणि भारतीय संविधान संरक्षण अभियान अंतर्गत संयोग सेवा सोसायटी हॉल, लूंबिनी बाग गोवंडी, पी .एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथील दि 10/5/2024 रोजीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले . एस के भंडारे पुढे असे म्हणाले की,डॉ भीमराव य आंबेडकर यांनी घोषित केल्याप्रमाणे डॉ बाबासाहेब यांची सामाजिक, धार्मिक व राजकीय क्रांती गतिमान करण्यासाठी संविधान विरोधकांना मतदान करायचे नाही आणि जर संविधान बदलले तर भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल रस्त्यावर येऊन आंदोलन करेल.
या वेळी मुंबई प्रदेशचे कोषाध्यक्ष विलास खाडे यांनी अँड प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला म्हणजे संविधान समर्थकाला मतदान देण्याचे आवाहन केले. या संवाद मेळाव्याचे आयोजन मिलिंद कसबे व आनंद वानखडे यांनी केले. सूत्रसंचालन झोन 5 चे उपाध्यक्ष दिलीप लिहिणार यांनी केले. यावेळी सिद्धार्थ रणपिसे, संघामित्रा पारखे, कैलास खाडे, ओंकार वानखडे, शशिकांत गायकवाड, विजय सोनवणे इत्यादी झोन क्रमांक ५, लिंबूनी बाग ,नालंदा बुद्ध विहार गोवंडी , बैगनवाडी, नागसेन बुद्ध विहार अमर महल , लल्लूभाई कंपाउंड, तक्षशिला बुद्ध विहार भिमवाडी गोवंडी, आनंदनगर,गौतमनगर या शाखांचे पदाधिकारी, केंद्र शिक्षक,शिक्षिका,बौद्धाचार्य समता सैनिक दलाचे सैनिक, उपासक-उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचित-बहुजनांचे नेते अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस टाळ्या व स्वाभिमान दिनाचा जयघोष करून केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत