बेंबळा धरण ते यवतमाळ शहर पाईप लाईन लवकरात लवकर सुरू करावी. -नागपूर खंडपीठाचे राज्य शासनाला आदेश.

यवतमाळ : संपूर्ण राज्य भीषण उकाडा आणि उन्हाने त्रस्त आहे. कांहीं ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा जाणवत असला तरी बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
यवतमाळ जिल्हा पाणी टंचाई ने ग्रस्त आहे. गाव खेड्यातील तसेच शहरातील कांहीं भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वाढत चालला आहे. यातूनच पाईप लाईन टाकण्याची मागणी करण्यात आली होती. यवतमाळातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर दाखल करण्यात आलेल्या फौजदारी जनहित याचिका प्रकरणावर गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. ३०२ कोटी रुपयांच्या या अमृत योजना प्रकल्पात बेंबळा धरणापासून यवतमाळ शहरापर्यंत मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या पाईपलाईनची जलशास्त्रीय चाचणी (हायड्रॉलिक सर्वे) पूर्ण करू शकते, अशी माहिती मे. पी. एल. आकडे, नाशिक या कंपनीने उच्च न्यायालयाला दिली. त्यानुसार, ही प्रक्रिया सहा आठवड्यांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला दिले.
येथील लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रियासुद्धा आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे, आता आचारसंहितेचे कारण न देता पाईपलाईन टाकण्याच्या कंत्राटाला मंजुरी देऊन लवकरात लवकर कामाला सुरुवात करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत.
या प्रकरणी पुढील सुनावणी २६ जून रोजी निश्चित करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत