उद्याचे मतदान..

मुंबई: उद्या म्हणजेच सोमवार दिनांक १३ मे रोजी लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १० राज्यांतील ९६ मतदारसंघात मतदान होणार आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील सर्व मतदारसंघांमध्ये १३ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यात १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यातील राज्ये आहेत
आंध्र प्रदेश (२५),
बिहार (५),
जम्मू आणि काश्मीर (१),
झारखंड (४),
मध्य प्रदेश (८),
महाराष्ट्र (११),
ओडिशा (४),
तेलंगणा (१७) ,
उत्तर प्रदेश (१३),
आणि पश्चिम बंगाल (८)
महाराष्ट्रात एकून ११ जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील
नंदुरबार,
जळगाव,
रावेर,
जालना,
औरंगाबाद,
मावळ,
पुणे,
शिरूर,
अहमदनगर,
शिर्डी,
आणि बीड
या मतदार संघात खासदारकी साठी लढत होणार आहे.
सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे यासाठी सर्व राजकीय पक्ष व निवडणूक यंत्रणा प्रयत्न करीत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत