सांप्रदायिक सलोखा कसा राखावा !

अखंड भारताचा निर्माता सम्राट अशोक हे... सांप्रदायिक सलोखा कसा राखावा... याविषयी त्यांनी इ.स.वी.सन पूर्व तिसऱ्या शतकात मांडलेले विचार (आंध्र प्रदेश, येरागुडी शिलालेख)
(संकलन व स्पष्टीकरण राजीव शिंदे)
मी देवतांचा व गृहस्थांचा लाडका प्रियदर्शी राजा, सर्व संप्रदाय त्यांची उपासना तसेच तपस्वी जनांचा आदर व स्वागत करतो.
तरी मला असे वाटते की पूजा-अर्चा, उपासना व दानधर्म यापेक्षाही संप्रदायाच्या तत्त्वांना मी अधिक महत्त्व देतो व त्यांच्या मूलभूत तत्त्वांची सर्व समाजामध्ये वाढ कशी होईल ह्याला मी महत्त्व देतो.
सर्व पंथांच्या तत्त्वांची वाढही कालानुक्रमे होतच असते परंतु त्यांच्या वाढीचे मूळ स्त्रोत्र संयमच असला पाहिजे.
आपल्या संप्रदायाच्या वाढीसाठी आपण आपल्या संप्रदायाची स्तुती करतो व इतर संप्रदायांच्या तत्त्वांची निंदा करतो असे करून तो आपल्याच संप्रदायाचे अतोनात नुकसान करीत असतो.
सर्व संप्रदायांनी एकत्र राहून एकमेकांच्या तत्वांची ओळख करून घेणे व सखोल तत्त्वचिंतन करणे हे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वांचे कल्याण होईल.
एकमेकांच्या संप्रदायांची तत्वे जाणून घेणे ही पण एक फार मोठी सेवा होय. तसेच सर्व जन हे बहुश्रुत( सर्व संप्रदायांच्या तत्त्वांची ओळख) असावेत असे वाटते. सर्व संप्रदायांच्या तत्वांच्या सखोल अभ्यासाने सर्वजण ज्ञानाने परिपूर्ण होतात.
केवळ पूजाअर्चा करून आपल्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे विस्तारीकरण हे शक्य होत नसते तर महत्त्वाचे म्हणजे संप्रदायाचे सारतत्त्व हेच महत्त्वाचे असले पाहिजे आणि हे सारतत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सर्व संप्रदायांच्या सारतत्त्व वाढीसाठी धर्म महामात्र,स्त्री महामात्र, ब्रज भूमीक आणि इतर तत्सम राजेशाही कर्मचारी नेमलेले आहेत. या नवीन निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे प्रत्येकाला आपला संप्रदाय वाढविण्यासाठी मदत केली जात आहे.
अखंड भारतातील (जंबुद्वीप) जनता बहुश्रुत, संयमी, ज्ञानी व सर्व संप्रदायांच्या तत्वांची आदर करणारी असावी.
( हा सम्राट अशोकाचा शिलालेख अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे)
धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको , नांदेड .
भवतु सब्ब् मंगलम्
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत