दिनविशेष- शुक्रवार दिनांक 10 मे 2024
आज दि. १० मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, सुक्कवारो, वेसाख मासो, शुक्रवार, वैशाख माहे.
१० मे १९२२ – रोजी छ्त्रपती शाहू महाराजांच्या निर्वाणाने विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोकाकुल होऊन त्यांनी राजाराम महाराजांना पत्र लिहिले. आपल्या पत्रात ते म्हणतात की, “महाराजांच्या निधनाची बातमी इंग्रजी वर्तमानपत्रात वाचली व मला धक्का बसला या दुःखद घटनेमुळे मला दुःख झाले. त्यांच्या निधनाने मी माझ्या एका खास मित्रास आचवलो आहे. अस्पृश्य वर्ग तर आपल्या एका मोठ्या हितचिंतकांना मुकला आहे. त्यांच्या काळजाचा सर्वात महान कैवारी हरपला आहे. मी दुःखाने विव्हळत असता आपल्या नि गतधवां महाराणीच्या दुःख प्रसंगी मी मनपूर्वक सहानुभूती व्यक्त करण्याची त्त्वरा करीत आहे.”
१० मे १९३८ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका क्रिमिनल (फौजदारी) खटल्याच्या निमित्ताने नागपूर येथे आले असता इंदोराला त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बाबासाहेब म्हणाले की, “निवडलेल्या लोकांनी आपली कामे पूर्ण करावीत याची काळजी घ्यावी.”
१० मे १९४३ – रोजी इंडियन फेडरेशन ऑफ लेबर या संस्थेच्या मुंबई शाखेतर्फे मजूरमंत्री विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ समारंभ.
१० मे १९४३ – रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई या संस्थेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. त्यात ते म्हणाले की, “साम्राज्य विस्तार, वर्णविद्वेष आणि दारिद्र्य या तीन रोगांची जगाला बाधा झालेली आहे. भारताची आर्थिक आणि औद्योगिक शक्ती वाढेल, तेव्हा साम्राज्यवाद आणि काळ्या गोर्यांचा वाद मिटेल.”
१० मे १९५४ – रोजी प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांचा जन्मदिन.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत