निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

निवडणूक खर्चात तफावत; उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस.

पुणे : लोकसभा निवडणुक 2024 मध्ये निवडणूक आयोगाच्या कार्य पद्धतीवर बरेच आक्षेप घेण्यात आले. संविधान बदलण्याची भाषा करणारे उमेदवार, देवधर्मावर भाषणात उघड उघड वक्तव्य करणारे ज्येष्ठ नेते, खुद्द नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेले वक्तव्य यावर तक्रार करूनही आयोगाने कसलीही कारवाई केली नसल्याने नेते आणि मतदार यांच्या मनात शंका आहे.

अशातच आयोगाने मात्र पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवडणूक खर्चात दुसऱ्या फेरीत तफावत आढळली असल्यामुळे सर्वांना नोटिसा पाठवून, त्याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.

मोहोळ यांच्या वतीने खर्च १३ लाख सहा हजार ४७४ रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शॅडो खर्चाशी पडताळणी केली असता प्रत्यक्षात ४९ लाख ३४ हजार ५८ रुपये खर्च झाल्याची नोंद आढळली. त्यामुळे खर्चात ३६ लाख २७ हजार ५८४ रुपयांची तफावत आढळली. त्यांचे प्रतिस्पर्धी रवींद्र धंगेकर यांच्या खर्चात ११ लाख ६७ हजार ७०९ रुपयांची तफावत आढळली आहे. निवडणूक खर्चाचे स्वतंत्र खाते न उघडल्याबाबत पुणे मतदारसंघातील अन्य चार उमेदवारांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!