कॉंग्रेस पक्षाचे चरित्र.,किस्सा १९७८ चा…

महाराष्ट्रातील १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नाशिकराव तिरपुडे यांचे नांव दिल्लीतून इंदिरा गांधी यांचा संदेश घेऊन महाराष्ट्राचे प्रभारी आले. त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची मुंबई मध्ये बैठक घेतली आणि पक्षाध्यक्ष इंदिरा गांधी यांचा संदेश वाचून दाखविला की,नाशिकराव तिरपुडे यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे…!!
दिल्ली दरबारातील इंदिरा गांधी यांचा संदेश महाराष्ट्रातील मराठा आमदारांना रुचला नाही. तेव्हा महाराष्ट्रात मराठा समाजाचे कॉंग्रेस पक्षाचे एकूण १४० आमदार होते….!!
आम्ही १४० मराठा आमदार असतांना पक्ष बौद्ध मुख्यमंत्री कसा बनवितं आहे ?असा सर्वच मराठा आमदारांनी गलका केला. दिल्ली वरुन आलेल्या प्रभारी ला मराठा आमदारांनी सडो की, पडो करुन सोडले…!!
प्रभारी ऊलटपावली दिल्लीला परत गेले, त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील १४० मराठा आमदारांचे शिष्टमंडळ दिल्लीला इंदिरा गांधी यांची भेट घेण्यासाठी गेले, त्या सगळ्या कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी इंदिरा गांधी यांना ठणकावून सांगितले जर नाशिकराव तिरपुडे मुख्यमंत्री होतं असतील तर आम्ही बंडखोरी करु पक्षाचा आदेश पाळणारं नाही…. !!
दिल्लीत खलबते झाली,कॉंग्रेस पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी नाशिकराव तिरपुडे यांची समजून काढण्यात आली.मराठा मुख्यमंत्री झाला आणि नाशिकराव तिरपुडे यांना उपमुख्यमंत्री बनविले. उपमुख्यमंत्री हे संवैधानिक पद नाही. नाशिकराव तिरपुडे हे देशातील पहिले उपमुख्यमंत्री आहेत. त्यांची बोळवण करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री हे तडजोड करण्यासाठी निर्माण केलेले पद आहे. उपमुख्यमंत्री यांना कुठलेही विशेष अधिकार नसतात ते फक्त एक मंत्री असतात…!!
महाराष्ट्रातील सरंजामी कॉंग्रेस पक्षाचा हा इतिहास आहे. महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री हवा परंतु बौद्ध मुख्यमंत्री आम्हाला चालतं नाही ही मानसिकता१९७८ साली होती. ती आजपर्यंत कायम असल्याचे दिसून येते….!!
कॉंग्रेस पक्षाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात मराठा, अल्पसंख्याक मुस्लिम, अल्पसंख्याक ब्राह्मण, अल्पसंख्याक बंजारा, अल्पसंख्याक चांभार मुख्यमंत्री होऊ शकतो मात्र बौद्ध मुख्यमंत्री बनविल्या गेला नाही. ही वस्तुस्थिती आहे…!!
महाराष्ट्रातील विदर्भ विभागात बौद्ध समुहाचे प्राबल्य आहे आणि विदर्भ हा कॉंग्रेस पक्षाचा गड आहे त्या विदर्भातील नाशिकराव तिरपुडे यांना मुख्यमंत्री बनवून कॉंग्रेस पक्षाचा जनाधार भक्कम करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी घेतलेला निर्णय इथल्या सरंजामी वृत्तीच्या मराठा नेतृत्वाला मान्य नव्हता त्याचे पडसाद १९७८ साली उमटले आणि नाशिकराव तिरपुडे मुख्यमंत्री होऊ शकले नाही…!!
महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाचा हा जातियवादी चेहरा आजही कायम टिकून आहे. मोगलाई मराठे हे आंबेडकरी विचारधारेचे कायम विरोधकच राहिले आहेत...!!
महाराष्ट्रातील कॉंग्रेस ही मोगलाई मराठ्यांच्या १६९ घराण्यात बंदिस्त झाली आहे...!!
कॉंग्रेस पक्षाला फक्त आंबेडकरी मते हवी आहेत. कॉंग्रेस मध्ये असलेल्या आंबेडकरी नेतृत्वाला मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही. रिपब्लिकन पक्ष मोडतोड करण्याची भुमिका घेऊन चळवळ करणारे नेतृत्व नामोहरम करायचे.आंबेडकरी नेतृत्व ऊभं राहू द्यायचं नाही. आंबेडकरी राजकीय पक्ष सुद्धा ऊभा द्यायचा नाही. आंबेडकरी विचारधारेच्या राजकीय पक्षासोबतं युती सुध्दा करायची नाही हा कॉंग्रेस पक्षाचा आजवरचा महाराष्ट्रातील अनुभव आहे..!!
यापूर्वी कॉंग्रेस पक्षाने रिपब्लिकन गटासोबतं युती करून निळा झेंडा वापरला आणि तुमची मते घेतली. काही लाचार लोकं सोबतं घेऊन त्यांच्या मार्फत आंबेडकरी मते विकतं घेण्याचा प्रयत्न केला आणि सत्ता मिळविली..!!
आंबेडकरी विचारधारेच्या राजकीय पक्षात आमदार निवडून आले तर त्यांना विकतं घेऊन आंबेडकरी विचारधारेचे राजकारण संपविण्याचा कॉंग्रेस पक्षाने पुरेपुर प्रयत्न केला हा अनुभव आहे... !!
संधीसाधू लोक वापरुन झाले, रिपब्लिकन पक्षाच्या नावांवर स्वार्थी आणि लाचार लोकं वापरुन झाले आता विचारवंत अशी बिरुदावली लावून शिक्षित संधीसाधू लोक वापरण्याचा षढयंत्रकारी फंडा कॉंग्रेस राबवितं आहे…!!
आंबेडकरी मतदारांनो कुणाच्याही भुलथापांना बळी पडू नका. आपले स्वतंत्र राजकारण ऊभे करण्यासाठी स्वाभिमानी राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी ला भरभरून प्रतिसाद द्या आणि राजकीय अस्तित्व निर्माण करा…!!
खुप झाले दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणे, आता भिमाचा नातू राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटतो आहे आणि तुम्हांला साद घालतोय...!!
ज्या कॉंग्रेस पक्षाने लायकी असुनही नाशिकराव तिरपुडे यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही. ज्या कॉंग्रेस पक्षाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध करुन आंबेडकरी जनतेला मराठवाड्यात सतरा वर्षे सडो की पडो करुन सोडले. ज्या कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत खैरलांजी, घडले. रिडल्स चा वाद चिघळला त्या कॉंग्रेस पक्षाची वकीली कुणी करीत असेल तर तो कु-हाडीचा दांडा आहे...!!
महाराष्ट्रातील ७ मे १३ मे आणि २० मे या तीन टप्प्यातील मतदान आहे आणि मतदान हे आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव राजकीय पक्ष आंबेडकरी विचारधारेचे राजकारण शाबूत ठेवण्यासाठी लोकसभेच्या आखाड्यात सक्षमपणे ऊभा आहे. आंबेडकरी विचारधारेचे स्वतंत्र स्वाभिमानी बाण्याचे राजकारण यशस्वी करायचे ही भुमिका लक्षात घ्या. आणि मताधिकार बजावा ही नम्र विनंती...!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत