राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक लोकशाही चे आधारस्तंभ- प्रा. राजकुमार जाधव

26 जानेवारी 2024ला भारतात लोकशाहीची प्रस्थापना होऊन 74 वर्ष होत आहेत. या74 वर्षाच्या कालखंडात भारतीय लोकशाहीने विकासाचे अनेक टप्पे पार पडले आहेत. भारता सोबतच ज्या देशांनी लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला होता. तेथे कधीही लोकशाही शासन व्यवस्था स्थिर होऊ शकली नाही. परंतु भारत मात्र आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून ताठ मानेने मिरवत आहे. आज या लोकशाही समोर भ्रष्टाचार, जातीयवाद, प्रदेशवाद, दहशतवाद यासारख्या प्रमुख समस्या उभ्या टाकले आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारतीय महापुरुषांच्या, समाजसुधारकांच्या विचाराकडे वळावे लागणार आहे. भारतीय समाजसुधारकापैकी एक प्रमुख समाज सुधारक म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख करावा लागेल. राजर्षी शाहू महाराजांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभीच मानव मुक्तीसाठी प्रयत्न केले. भारतात लोकशाही रुजवणुकीतील त्यांचा वाटा महत्त्वपूर्ण राहिला आहे. भारतीय सामाजिक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्याचे काम त्यांनीच केले आहे. भारतीय लोकशाहीतील अनेक क्रांतिकारी घटनांचा आरंभ त्यांनी त्यांच्या संस्थानात केला. राज्यकारभार हाती घेतल्यानंतर तिथे लोकशाही रुजवणुकीसाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केले. विशेषतः त्यांचा कटाक्ष हा येथे सामाजिक लोकशाही कशी रुजेल यासाठीच होता. सामाजिक लोकशाहीसाठी प्रयत्न करीत असताना आपल्या राज्यांमध्ये राजकीय समतेसाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी विशिष्ट जात समुहाची मक्तेदारी मोडीत काढून सामान्य लोकांना राज्यकारभारात जास्तीत जास्त सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली.सक्तीचे व मोफत शिक्षण सुरू केले. बहुजन समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी, त्यांची प्रगती साधण्यासाठी,सत्तेत वाटा मिळविण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे हे ओळखले म्हणून ‘प्रत्येक मुलाला आणि मुलीला शिक्षण मोफत व सक्तीचे’ असा कायदा केला. आपल्या ‘मुला मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दंड ठोठावला’.शिक्षण हे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी’ शाळेला वस्तीगृहाची जोड ‘दिली.कोणत्याही देशातील लोकशाहीची यशस्वीता तेथील नागरिकांच्या सुशिक्षित प्रमाणावर अवलंबून असते.याचा विचार करून ‘लोकशाहीचा महत्वपूर्ण घटक असणाऱ्या स्त्रियायांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले.स्त्रीयांच्या शिक्षणासाठी खास सोयी सवलती जाहीर केल्या.’मागासवर्गीय स्त्रियांच्या शिक्षणाची व निवासाची मोफत सोय’ केली.’राज्यातील व राज्याबाहेरील विद्यार्थीनी साठी खास शिष्यवृत्ती’ दिली.सामाजिक समतेसाठी अनेक वाईट रूढी,प्रथा, परंपरा बंद केल्या समाजातील उच्चनिचता नष्ट करण्यासाठी, दलितांना प्रतिष्ठा देवुन पुढे आणले. दलितांना विविध अधिकाऱ्यांच्या सनदा दिल्या,उद्योग व्यवसायासाठी विशेष प्रयत्न केले,पोलीस आणि प्रशासनात दलितांना महत्वाच्या पदावर नेमणूका केल्या.सामाजिक समतेसाठी कृतीयुक्त प्रारंभ केला. आपल्या क्षेत्रात ‘आरक्षणाचे धोरण राबवून त्याच्या माध्यमातून सामाजिक समता प्रस्थापित करायचा प्रयत्न केला’.एकंदरीत शाहू महाराजांनी आखलेल्या धोरणातून समाजातील प्रत्येक घटकाला, शोषित घटकांना शासन व्यवस्थेच्या कोणत्या ना कोणत्या संस्थेत सहभाग मिळाला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसून येते.यातूनच सर्वांचे कल्याण साधता येईल असा विचार त्यांन रुजविला.अशा या माणसातील राजाला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ????????
-प्रा. राजकुमार जाधव.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत