मोदींना एका एका राज्यात प्रचारासाठी उन्हातान्हात एवढं वणवण भटकावं का लागत आहे..


तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारापर्यंत महाराष्ट्रात मोदींच्या १२ सभा पार पाडल्या आहेत . मोदी यांच्या राज्यात आणखी ५ते ६ जाहीरसभा होतील , अशी शक्यता वर्तवली जात आहे .
मोदींना एका एका राज्यात प्रचारासाठी उन्हातान्हात एवढं वणवण भटकावं लागत आहे . छोटे छोटे पक्ष , गल्लीबोळातील छोट्या नेत्यांनाही जवळ करावे लागत आहे . इतकेच नव्हे तर विरोधी पक्ष फोडून त्यांना भाजपात आणून निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचाही वापर करावा लागत आहे . हे कमी का काय म्हणून चोर , भ्रष्टाचारी , बलात्कारी , गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना भाजपात आणून , त्यांनाही निवडणूकीत उभे केले आहे .
मोदी स्वतःला विकासपुरूष समजतात , तसे म्हणून घ्यायला लावतात , जर १० वर्षात या देशाचा विकास झाला असता , लोकांना तो दिसला असता तर मोदींना उन्हातान्हात फिरावे लागले नसते , एवढया सभांची गरज भासली नसती . अच्छे दीन , विकास , सुखशांती बघून लोकांनी स्वतःहून मोदींना मत दिले असते .
अच्छे दीन , विकास , हाताला काम , शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट , महीला सुरक्षा , महागाई , गरीबी हे प्रश्न मार्गी लावले असते , तर मोदींना एवढया प्रचारसभा कराव्या लागल्या नसत्या . हे प्रश्न सोडवले नाहीत , दिलेली आश्वासने पाळली नाहीत , म्हणून मोदींवर ही वेळ आली आहे .
अच्छे दीन , नोटबंदी , महागाई , बेकारी , गरीबी वगैरेंचा २०१९ ला एकाही प्रचारसभेत उल्लेख केला नाही आणि आताही त्यांचे नाव काढत नाहीत . ५० दिवसात नोटबंदीचा फायदा सांगणार होते , आता तर २०२४ उजाडले तरी अजूनही फायदा सांगितला नाही .
अशी शेकडो काय हजारो उदाहरणे सापडतील . नुसत्या थापा मारून १० वर्ष काढली .
कामाच्या नावाने मत मागता येत नाही , म्हणून देवधर्माला पुढे केले जात आहे , मध्येच ३७०, तीन तलाक , मुस्लिम , मंदिर , मशिद काढावे लागत आहे .
मोदींच्या आधीही पंतप्रधान होते , त्यांनी कधी इतक्या प्रचारसभा घेतल्या नाहीत . त्या पंतप्रधानांनी पक्षापेक्षा देशाला महत्त्वाचे स्थान दिले होते , या पंतप्रधानांना देशापेक्षा पक्ष महत्त्वाचा वाटतो . देशहितापेक्षा पक्षाचे हित कशात आहे हे बघतात . देशहिताचे काम केले असते , विकास केला असता , अच्छे दीन आले असते तर मोदींना प्रचारसभांची गरज नव्हती . महाराष्ट्रात जेवढ्या सभा घेतल्या ना तेवढया सभा देशभर घेतल्या असत्या तरी मोदी निवडून आले असते .
@ सुनील पवार
दसवेल
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत