आजच्या काळात अशा वास्तववादी प्रयोगाची गरज .. !

एक माणूस त्याच्याकडे असलेल्या डुकरासोबत एका बोटीतून प्रवास करत होता. तर दुसऱ्या माणसाकडे कुत्रा होता; आणि तो कुणालाच चाऊ नये म्हणून बांधून ठेवला होता; परंतु तो काहीच कारण नसताना भुंकत होता.
त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच, एक तत्त्वचिंतकही प्रवास करत होता.
डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते अस्वस्थ होतं. सारखं वर-खाली जात होतं. त्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता. तसेच कुत्र्याच्या भूनकण्या मुळे हि लोक वैतागले होते.
नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे बोट बुडेल की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्या मालकाचे ते डुक्कर होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता. आणि कुत्र्याचा मालक ही अस्वस्थ होता की काहीच कारण नसताना कुत्रा भुंकत होता.
तत्त्वचिंतक हे सगळं निरखून पाहत होता. त्याने मदत करायचं ठरवलं.
तो नावाड्याला म्हणाला, “तुमची परवानगी असेल, तर मी या डुकराला व कुत्र्याला एकदम गरीब मांजरी सारखं बनवू शकतो”.
दोन्ही प्राण्यांच्या मालकांनी लागेच “हो” म्हटलं.
मग त्या तत्त्वचिंतकाने दोन सहप्रवाशांच्या मदतीने डुकराला उचललं आणि पाण्यात फेकलं.
डुक्कर जीवाच्या आकांताने पोहायला लागलं.
थोडया वेळाने त्या तत्वचिंतकाने डुकराला पुन्हा बोटीत ओढून घेतलं. त्यानंतर ते डुक्कर अगदी शांत, बोटीच्या एका कोपऱ्यात बसून राहिलं.
नंतर हाच प्रकार त्यांनी कुत्र्यासोबत केला; कुत्र्याला काहीवेळ मजा वाटली; ते पोहण्याचा मजा घेऊ लागले; परंतु थोड्याच वेळात त्याच्या लक्षात आलं की बोट दूर जाते आहे आणि किनारे खूप दूर आहेत; काही वेळात आपण थकू आणि डुबून मरू; आणि मग ते बोटीच्या दिशेने पोहायला लागलं; तत्वचिंतकणे कुत्र्याला आत घेण्यास मदत केली नाही; कुत्रा भुंकायला लागला आणि काही वेळातच ते कान्हायला लागलं; तेव्हा तत्त्वचिंतकनी हात देऊन त्याला आत घेतला.
आता डुक्कर मांजरी सारख शांत बसला होतो; तर कुत्र्याने जमिनीवर लोळण घेऊन भुंकन बंद केलं होतं;
दोन्ही मालक आणि इतर प्रवासी हा बदल बघून अवाक झाले. मालकाने तत्त्वचिंतकाला विचारलं, “आधी हे इतकं गोंधळ माजवत होतं, आणि आता भीगी बिल्ली सारखं पडून आहे. हे कसं काय?”.
तत्त्वचिंतक म्हणाला, “दुसऱ्याचं दुःख स्वतः अनुभवल्याशिवाय कोणाला कळत नाही. मी जेव्हा यांना पाण्यात फेकलं, तेव्हा त्याला पाण्यात असलेल्या धोक्यांची जाणीव झाली आणि बोटीचं महत्त्व कळलं”.
आज भारतात जी डुकरं कुत्र आरक्षणाविरोधात/संविधानाविरोधात गोंधळ घालत आहेत, त्यांना किमान ६ महिने मनुस्मृती नुसार वागवायला पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यापासून वंचित करावयास हवे, अस्पृश्य ठेवायला पाहिजे, गळ्यात मडके व पाठीमागे खराटा बांधून सार्वजनिक ठिकाणी फिरवले पाहिजे. अंगावरचा शर्ट काढून; डोक्याची चप्पी करून हातात भिक्षापात्र घेऊन, “भिक्षा देही” म्हणण्यासाठी उघडे फिरवले पाहिजे. बस ट्रेन विमान तर सोडा पायातील चप्पल ही काढून नग्न पावलाने फिरविले पाहिजे. मग संविधान काय असते ? याची जाणीव झाल्यानंतर ती गपगुमान बसतील.
भारतीय संविधानाला, आरक्षणाला सतत शिव्या घालणाऱ्या सर्व ‘ भारतीय ‘ डुकरांना कुत्र्यांना समर्पित.
✍️एक तत्वचींतक !
जय भारत .. जय संविधान
इंजी प्रदीप ढोबळे, अध्यक्ष ओबीसी सेवा संघ
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत