आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मिठाईचे वाटप.

दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने अनेक शुभेच्छा.

धाराशिव : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या “भारतीय बौद्ध महासभा” या धम्म संस्थेच्या तृतीय अध्यक्षा, आदरणीय महाउपासीका, आयु. मीराताई आंबेडकर यांचा 89 वा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला.
आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शाखा उस्मानाबाद दक्षिण वतीने आज रोजी सकाळी 11.00 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थिताना मिठाई वाटप करण्यात आली. याप्रसंगी सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत