निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र..! पुरोगामी महाराष्ट्रातून महार, मांग, मुसलमानास भारताच्या संसदेत प्रवेश नाही ! – आयु. विजय बनसोडे.

RSS प्रणित भाजपा संविधान बदलणार आहे म्हणून भाजपला हटवून कॉंग्रेस पक्षाला सत्ताधारी बनवा असा सुर विचारवंत म्हणवून घेणारे काही कमजोर पडीक आळवतं आहेत…!!

भारतीय जनता पार्टीला संविधान विरोधी पार्टी सांगून काँग्रेस सत्तेमध्ये बसविण्याचा डाव खुद्द भाजपा आणि सनातनी लोक करत आहेत ! स्वतःला भारताचे महामहीम समजणारे माजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रचार सभामधुन “आम्ही संविधानाला धक्का सुद्धा लावणार नाहीत”.असं सांगतं आहेत.आणि त्याच बरोबर काँग्रेसवर टीका करण्याचं षडयंत्र करत आहेत.परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीने देशातील बहुजन समाजाच्या
शिक्षण आणि नोकऱ्या,उद्योग, व्यवसाय,आरोग्य विषय विरोधात जवळपास शेकडो प्रकारचे कायदे केले आहेत त्याचे काय ? तर मागच्या 70 वर्षांमध्ये काँग्रेस पार्टीने भारतीय संविधानाची अंमलबजावणी किती प्रमाणात केली ? याची सुद्धा उत्तरे नरेंद्र मोदींनी जनतेला दिली पाहिजे.वास्तविक पाहता भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्याचं काम काँग्रेस आणि भाजपने किती केलं हा चिक्कीसेचा मुद्दा आहे.परंतु देशांमध्ये शिव,बसव, फुले,शाहू,बाबासाहेब,आण्णाभाऊ यांच्या परिवर्तनवादी विचाराचा तिसरा पर्याय राज्याच्या आणि देश्याच्या सत्तेमध्ये येऊच नये,हे षडयंत्र काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी दोघे मिळून करत आहे.

वास्तविक पाहता भारताच्या संविधानाला कुचकामी ठरवण्याचं षडयंत्र केल्याने देश्यातील कुण्या एका समाजाचे नुकसान होणार नाही.हे ही तितकच खरं आहे. भारताच्या संविधानावर घाला म्हणजे या देशातल्या एस.सी/एस.टी/ओ.बी.सी/ धार्मिक अल्पसंख्यांक (मायनॉरिटी) आदी समाजाच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणल्यासारखे आहे.याची जाणीव आता देशातील एस.सी/एस.टी/ओ.बी.सी मायनॉरिटीज जाती समूहांना चांगल्या प्रकारे झाली आहे.त्यामुळे 56 इंची प्रधानमंत्र्यावर आता संविधानाचे समर्थक होण्याची वेळ आली आहे.याची ही जाणीव बहुजन समाजातील मतदारांना झाली आहे.

महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागांवरती एक ही महार/मांग आणि मुस्लिम नाही ? प्रस्थापित राजकीय पक्षांकडून अर्थात इंडिया आघाडी आणि एन.डी.ए कडून महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील एकास ही लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही.याचा अर्थ असा की,या राज्यामध्ये एक ही लायक मांग,महार, मुस्लिम नाही,असाच समजावा का ?

पुरोगामी महाराष्ट्रातील महारा मांगांनो जरा याची लाज वाटू द्या,लोकसभे सारख्या महत्त्वपूर्ण राजकारणातून तुम्हाला खड्यासारखं बाजूला फेकण्याचं हे षडयंत्र उधळून लावा.महाराष्ट्रातल्या 48 जागे पैकी एकमेव लातूरची जागा वंचित बहुजन आघाडीने मांगाला दिली.अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिले.याच परिवर्तनवादी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या लोकसभेत कुणबी,मराठा,आदिवासी,भटका,मुस्लिम,लिंगायत उमेदवार दिला.काय याचा आपण विचार करणार आहात की नाही ?

देशाच्या संसदे मध्ये महाराष्ट्रातील महार, मांग,मुसलमानांनी प्रतिनिधित्वच करायचं नाही.असे षडयंत्र भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्या पिलावळीचं आहे.या षडयंत्राला अर्थात या राजकीय पक्षांना पायाखाली घेऊन चिरडण्या शिवाय दुसरा पर्याय नाही.

उठा जागे व्हा ! महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या मताच्या माध्यमातून सहकार्य करा आणि इथल्या जातिवादी काँग्रेस बीजेपी शिवसेने सारख्या संविधान विरोधी पक्षांना धडा शिकवा !

उस्मानाबाद लोकसभा :—–
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण उस्मानाबाद लोकसभेचा विचार करू ! वास्तविक पाहता मागच्या 50 वर्षांमध्ये आपल्या लोकसभेमध्ये विकासाची कोणती कामे झालेली आहेत ? याचा विचार करणे गरजेचे आहे.उस्मानाबाद लोकसभेतील सुशिक्षित बेरोजगार, कामगार,मजूर,शेतमजूर,मजूर महिला,विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षण शिष्यवृत्ती,विविध उद्योग-व्यवसाय यासंबंधी इथे निवडून आलेल्या आत्ता पर्यंतच्या खासदारांनी काय काम केले ? याचा विचार मतदान करताना प्रत्येक मतदाराने करायला पाहिजे. उस्मानाबाद लोकसभेच्या विकास आणि औद्योगीकरणाच्या दृष्टीने खासदारांनी काय काम केले ?? लोकसभा खासदार पदाची निवडणूक ही देशाच्या संसदे मध्ये बसून देशाच्या एकूण विकास आराखड्यात उस्मानाबाद लोकसभेचे प्रतिनिधित्व करणे, इथल्या समस्या प्रामुख्याने मांडणे, सार्वजनिक व सर्वसमावेशक समस्यांना सोडविणे,सभेत लोकसभा क्षेत्रात नवनवीन उद्योग व्यवसाय उभा करणे अशी अनेक काम करता येऊ शकतात परंतु आपण मागच्या दहा वर्षा पंधरा वर्षांमध्ये पाहिला आहे की लोकसभेचे खासदार सुद्धा वार्डाच्या नगरसेवकाप्रमाणे काम करत असतात.त्यामुळे यांना नगरसेवक म्हणावं की खासदार म्हणावं असा प्रश्न पडत असतो.त्यामुळं आपण खासदार निवडून द्यावा, नगरसेवक नाही !

लेखक – आयु. विजय अशोक बनसोडे
जिल्हा संघटक, भारतीय बौद्ध महासभा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!