दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

दिनविशेष – 5 मे 2024

आज दि. ५ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, आदिच्चवारो, चेत मासो, रविवार, चैत्र माहे.

५ मे १८१८ – रोजी कार्ल मार्क्स जयंती.

५ मे १९२३ – रोजी मध्यप्रांत वऱ्हाड महार परिषदेचे १२ वे अधिवेशन धुगाव जिल्हा अमरावती येथे.

५ मे १९४५ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीहून मुंबईला दुपारी आगमन झाले.

५ मे १९४५ – रोजी अखिल भारतीय दलित फेडरेशनचे तिसरे अधिवेशन. एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली परळ येथील नरेपार्क मैदानात झालेल्या जंगी सभेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आम्ही आमच्या कर्तुत्वाने आणि हिमतीने देशाकरिता जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू.” त्यांनी या परिषदेत केलेले भाषण पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजीत ‘कम्यूनल डेडलॉक अँड वे टू सॉल्व इट’ या नावाने प्रकाशित केले.

५ मे १९५० – रोजी नवी दिल्ली येथील बौद्ध धंम्मावरील व्याख्यानानंतर विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईला परतल्या नंतर, जनता पत्राच्या प्रतिनिधींना त्यांनी सांगितले की, “बौद्ध धंम्माकडे माझ्या मनाचा कल निश्चित झाला आहे. कारण बौद्ध धंम्मातील तत्त्वं टिकाऊ आहेत आणि समानतेवर आधारलेली आहेत.”

५ मे १९५६ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाचे ग्रंथपाल शां. शं. रेगे यांना “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे प्रकाशन बाबत पत्र लिहिले.

५ मे १९३५ – रोजी भारतीय बौध्द महासभा या मातृसंस्थेच्या तृतीय अध्यक्षा तथा समता सैनिक दलाच्या कमांडर इन चीफ, महामाता, महाउपासिका मीराताई यशवंत आंबेडकर यांचा जन्म दिन…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!