मनांतील संभ्रम काढून टाका..!

१) वंचितच्या उमेदवाराला मत दिले तर भाजप निवडून येईल.
२) वंचितने आघाडीला पाठिंबा द्यायला हवा होता…
३) मतं वाया जातील काय….
४) संविधान धोक्यात आले आहे काय…
ही शंका आणि समज विशेषतः बौध्द असलेल्या आंबेडकरी समाजांत महा विकास आघाडी कडून पसरवली जात आहे.आणि त्यांच्या या अपप्रचाराला आंबेडकरी बौध्द समाज, या समाजातील सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक संघटना बळी पडतं आहेत. ज्याचा आंबेडकरी बौद्ध समाजाने तार्किकपणे विचार आणि आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
मुद्दा क्रमांक १) :- महा विकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना निवडून दिले.तर तो,ते त्यांचा पक्ष उद्या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी . भाजप सोबत जाणार नाही याची तुम्हांला खात्री आहे काय….? तुमचे उत्तर नक्कीच असे असेल की ,नाही ! कारणं हे सर्व एकाच विचारांचे आहेत.आणि म्हणूनच याची खात्री देता येणारं नाही ! आणि हेचं सत्य आहे. जर ते उद्या भाजप सोबत गेले तर तुमचे मतं वायाच जाणार आहे.दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्याच हाताने . स्वतःच्या आंबेडकरी राजकीय विचार धारेच्या वंचित बहुजन आघाडीला मते न दिल्यामुळे .आज जी आरपीआयच्या वेगवेगळ्या गटांची ,नेत्यांची अवस्था झाली आहे .तशीच ती उद्या वंचित बहुजन आघाडीची होण्यास तुंम्ही जबाबदार राहणार आहात हे लक्षात ठेवा.
आपणं पराभूताची मानसिकता जोपर्यंत सोडणार नाही .तोपर्यंत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणू शकणार नाही.आणि आज ती पराभुताची मानसिकता सोडण्याची योग्य वेळ आली आहे. आणि म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू . मान श्रध्देय प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या . उमेदवाराला आपली एकगठ्ठा मते दिली तर तो निवडून येईलच.परंतू आपला आपल्या पक्षाची राजकीय ताकद वाढून . तो एक दबाब गट म्हणून भविष्यात राजकीय भूमिका बजावण्याचे कामं करूं शकतो.आणि म्हणूनच वंचितच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे.अशी भुमिका कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण न करता.बौध्द समाजाच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनी गावं पातळी पासून तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर घेतला पाहिजे.
मुद्दा क्रमांक २) वंचित बहुजन आघाडीने महा विकास आघाडीला पाठिंबा द्यायला हवा होता….? माझे मत आहे की अजिबात नाही.परंतू तरीही तसा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने आणि मान .बाळासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या क्षणापर्यंत केला.मात्र जर त्या प्रयत्नांना कुणी लाचारी, दुबळेपणा म्हणून समजतं असतील तर . मान प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. आज आपणं बघतोय की,मान रामदास आठवले साहेब, मान.जोगेंद्र कवाडे सर,मान.राजेंद्र गवई साहेब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या गटांना . या निवडणुकीत असो अथवा या पुर्वी झालेल्या निवडणुका असोत.त्यांना एकही जागा तर दिली जात नाही.परंतू त्यांना कोणताही पक्ष साध्या चर्चेला सुध्दा बोलवत नाही.आणि या पक्षांचा,गटांचा युतीला, आघाडीला पाठिंबा असल्याचे आपणं ऐकतो ,बघतो आणि अनुभवतो सुध्दा .या पक्षांचे , गटाचे नेते महायुती महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे मागे दिसतात.जणू काही ते दुय्यम दर्जाचे, फळीतील कार्यकर्ते असावेत अशी त्यांना वागणूक देण्यात येते.आणि याचे जसे मला दुःख वाटते तसेच ते तुम्हांला सुध्दा वाटतं असणारं हे नक्की. कारणं या सत्ताधारी आणि विरोधकांनी रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी समाजाला हलक्यात घेतात . त्यांना गृहीत धरले जाते. मात्र जर का या पक्षांनी कुणाच्या हि मागून फरफटत न जाता.स्वतंत्रपणे निवडणूका लढवल्या असत्या . तर या प्रस्थापित पक्षांनी त्यांना गृहीत धरू शकले नसते.नाक मुठीत धरून रिपब्लिकन नेत्यां सोबत चर्चेला बसले असते. आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या राजकीय ताकदीची उपयुक्तता इतरही राजकीय पक्षांना समजून घ्यावी लागली असती.जी सध्या तशा स्वरूपाने दिसून येत नाही.
याला अपवाद वंचित बहुजन आघाडी ठरते. ती कुणाच्याही पाठून लाचारी पत्करून जातं नाही.जर स्वताचे राजकीय अस्तित्व निर्माण करायचे असेल तर निवडणूका ह्या लढल्याच पाहिजे.आणि जर युती, आघाडी करायची असेल .आणि ती सन्मानजनक न्याय हक्कांची होणार नसेल तर .दोन हात करण्याची जिद्द ठेऊन ती लढते.आणि वंचित बहुजन आघाडी निवडणूका लढवून आपला मतांचा जनाधार वाढवत आहे.तो त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आघाडी करायला हवी होती का…? हा जो समज आहे तो “घरची उघडी आणि बाहेरचीला लुगडी” या पध्दतीचा समज आहे.जो वंचित बहुजन आघाडीने स्विकारण्याची काहीच गरज नाही.
मुद्दा क्रमांक ३) मतं वाया जातील काय…? तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करून मतं अजिबात वाया जात नाही. तुंम्ही ज्या समाज घटकांतून येता त्या वंचित समाज घटकांचे राजकीय प्रतिनिधित्व करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला .तुंम्ही जेव्हा मतदान करता .तेव्हां तुंम्ही तुमच्या राजकीय अस्तित्वाचा दाखला देत असता. भलेही तुमचे लोकप्रतिनिधी निवडून गेले अथवा नाही गेले तरीही . जेंव्हा लोकप्रतिनिधी कायदे मंडळात जे जे कायदे केले जातात.तेंव्हा तेंव्हा तुमच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा विचार करावाच लागतो. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे.जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले.तेव्हां राष्ट्रीय काँग्रेसच्या महात्मा गांधी यांनी असा दावा केला की, ते स्वतः आणि राष्ट्रीय काँग्रेस ही अस्पृश्य समाजांचे राजकीय प्रतिनिधित्व करीत आहे.तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील अस्पृश्य पुढा-यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर हेचं अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधित्व करतात .म्हणून ब्रिटिश सरकारला तातडीने तारा पाठवायला सांगितले होते . आणि याचा आपणं समाजानेही विचार करायला हवा. आज लोकशाही व्यवस्थेत राजकीय पक्षाला मिळणारी मते ही महत्त्वाची भूमिका बजावतात.जी एक दबाव गटाचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. आणि आंबेडकरी राजकीय दबाव वाढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला दिलेली मते ही त्याची साक्षीदार आहेत. जे पक्ष आंबेडकरी बौध्द समाजाची मते म्हणजे आपल्या हक्कांची मते असे समजतं होते.त्या पक्षांना आज आंबेडकरी बौद्ध मतांसाठी मान प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करावे लागते आहे. त्या मतांसाठी ते आज तुमचे उंबरठे शिजवायला तयार आहेत. तुमची, तुमच्या समाजाच्या राजकीय अस्तित्वाची ताकद तेंव्हाच उभी राहते.जेंव्हा तुमच्या राजकीय पक्षाचे नैतृत्व निडर निर्भीड असते .ते स्वाभिमानी आणि अभ्यासू,विचारी, राजकीय प्रगल्भता असणारे असते.धोका पत्करण्याची त्याच्यात हिंमत असते. आणि त्या सर्वांस मान प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे योग्य नैतृत्व ठरते. ज्याची कमतरता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या काळात समाजाने अनुभवली आहे.ज्याचा परिणाम म्हणजे कुणीही लुंगा सुंगा नेता,पक्ष आंबेडकरी बौध्द समाजाला गृहीत धरत होते आणि आजही धरतं आहेत.आणि हे जर मोडीत काढायचे असेल . तर आंबेडकरी बौध्द समाजाने त्यांची एकगठ्ठा मते वंचित बहुजन आघाडीलाच देणे आवश्यक आहे.
मुद्दा क्रमांक ४) संविधान धोक्यात येईल का…तर होय संविधान धोक्यात आले आहे.आणि त्याला जबाबदार आपणच आहोत.आंम्ही आमची राजकीय शक्ती उभी केली नाही.आंम्ही ज्यांना आमचे नेते समजलो ते स्वता साठी मंत्री आमदार खासदार म्हणून खुश झाले.तर कुणी मुख्यमंत्री होण्यासाठी आंबेडकर विरोधी राजकीय पक्षांशी समझोता करून त्यांना ताकद पुरवली. आणि आपणं आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान न करता . दुसऱ्या पक्षांना मतदान करून निवडून आणले.जे निवडून आले ते त्यांच्या पक्षाच्या धोरणास विरोध न करता .फक्त आपली खुर्ची संभाळत राहिले.आणि आंम्ही आमच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.ज्याचे उत्तर आंम्हीच देतं राहीलो की आंम्ही झिरो झालेलो आहोत. ज्याचा फायदा राष्ट्रीय काँग्रेस आणि त्याचेच प्रतिबिंब असणा-या जातीयवादी भाजपने उचलून संविधान धोक्यात आणले आहे. भाजपच्या सरकारमध्ये आणि विरोधात असलेल्या पक्षातील अनुसूचित जाती जमाती आणि बौद्ध धर्मीय खासदारांनी, आमदारांनी या विषयावर कधीतरी तोंडातून ब्र बाहेर काढला आहे काय….? या खासदारांना संसदेत बोलण्याची संधी दिली जाते काय…? का दिली जात नाही….? एससी एसटी समाजाला मिळालेल्या नोकरीच्या संधी .माजी प्रधानमंत्री नरसिंह राव, मनमोहनसिंग यांनी खाजगीकरण करून घालविण्या मागची भुमिका कुणाची होती ? ज्या नोकरीमुळे तुमचा आर्थिक विकास झाला,तुमचा सामाजिक, शैक्षणिक दर्जा सुधारला.ज्याला रोखण्यासाठी सर्वच पातळीवर खासगीकरणाचे धोरणं राबवली जात आहेत.आणि कौग्रेचेच धोरणं आज भाजपचे सरकार अंमलात आणत आहे. ज्याचा परिणाम तुमच्या विद्यार्थ्यांच्या स्कोलरशिफ रोखल्या जातं आहेत. तुमच्यासाठी देशाच्या बजेटमध्ये ठेवण्यात येणाऱ्या निधीला कात्री लावून तो अन्यत्र ठिकाणी खर्ची घातला जात आहे. दोन्ही पक्षांचे धोरणं हेचं आहे की संविधान कमजोर करणे. आणि ते जर थांबवायचे असेल तर आपल्या विचारांची राजकीय शक्तीला प्रबळ आणि प्रभावी करणे. जी निवडून येऊन कायदे मंडळात प्रभावी कामं करील.आणि पक्ष म्हणून रस्त्यावरच्या लढाईत राजकीय दबाव निर्माण करून संविधानाचे संवर्धन आणि जतन करूं शकेल.आणि म्हणूनचं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना लोकसभा असो वा विधानसभा अथवा जिल्हापरिषदांत मतदान करून निवडून आणले पाहिजे.आणि त्यासाठी इतर जो समाज आहे त्याला वंचित बहुजन आघाडीची भूमिका समजून दिली पाहिजे.
शिवसेना भाजप हे सुरूवातीला आमदार खासदार नसणा-या पक्ष हे हरत राहिले . आणि तरीही ते प्रत्येक निवडणुका लढवत राहिले.आम्ही तसेच वंचितच्या प्रत्येक निवडणुकीत वंचितलाच मतदान करूया .आणि आपल्या हक्काची राजकीय सत्ता आणूया.
जय भीम…!!
आयु अनिल जी जाधव
कपिल वास्तू नगर करबुडे
रत्नागिरी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत