आरोग्यविषयकदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानवातावरण

जागे व्हा, नाहीतर मृत्यू अटळ आहे ! – आयु. दिगंबर काशिद

“मृत्यु” महत्वाचा संदेश पूर्ण वाचा,
नाहीतर “मृत्यू” अटळ आहे फक्त पुढील ३ वर्ष…

••• होय मी इथे “मृत्यू” हा शब्द वापरत आहे कारण ते सत्य आहे…ग्लोबल वॉर्मिंग घेत आहे आपल्या पिढीचा वेध.. मित्रांनो सांगण्यास दुःख होत आहे की पुढील तीन वर्षांमध्ये भारताच्या वातावरण मध्ये प्रचंड असा बदल होणार आहे आणि तोच बदल ठरणार आहे भावी पिढीच्या मृत्यूला कारण.

••• सोबत मी एक इमेज जोडली आहे त्यामध्ये आपण बघू शकतो वातावरणातील बदल आणि ह्या आठवड्यामध्ये जगामध्ये भारताचे तापमान हे तिसऱ्या स्थानावर सर्वात आधिक आहे ते म्हणजे 44.5°C. म्यानमार, थायलंड यांसारख्या छोट्या देशांनंतर भारतासारखा मोठ्या देशांमध्ये ही अवस्था असणे म्हणजे अतिशय धोक्याची घंटा आहे. त्यामुळे वरती जसा मी बोललो की मृत्यू अटळ आहे आणि ते सत्य आहे.

••• सदर इमेज मध्ये आपण आपला भारत देश पूर्णतः उष्णतेमुळे गडद लाल झाला आहे त्यामुळे जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तापलेलं देश म्हणजे भारत आणि वेळेत जागे झालो नाही तर तो रंग जो दिसत आहे तो पुढील तीन ते चार वर्षांनंतर भारतातील स्मशानामध्ये पाहायला मिळेल.

••• आता आपण बोनस जीवन जगत आहोत कारण तापमान वाढ ही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे अजून देखील पुढील तीन वर्ष आपल्याजवळ वेळ आहे त्या वेळेत जर आपण अधिक वृक्ष, जंगल, पर्यावरण संवर्धन याकडे जर लक्ष दिले तरच पुढील तीन वर्षानंतर आपले जीवन जगणे शक्य आहे.

••• तीन वर्षांमध्ये आपण जर पर्यावरणाशी होणारी हानी रोखली नाही तर भविष्यामध्ये प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे वृक्षांच किंवा शेतीमधील पिकांचे बिजांकुरण होणार नाही आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पॉलिहाऊस शीवाय पर्याय राहणार नाही. तसेच प्रचंड तापमान वाढीमुळे पाण्याची देखील मोठी समस्या निर्माण होणार आहे.

••• आपण कितीही श्रीमंत असलो तरी निसर्गापुढे आपण निमित्त मात्र आहोत हे आपल्याला समजायला हवे आणि त्यानुसार विचार करायला हवा. वारे माप संपत्ती आपण जमवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत पण जर निसर्ग आणि पर्यावरण संतुलित नसेल तर आपल्याला ऑक्सीजन देखील मिळणार नाही आणि वातावरणातील तापमानामुळे त्यांच्यासाठी संपत्ती कमवत आहात त्यांनाच जगणे मुश्किल होणार आहे. आर्थिक संपत्ती पेक्षा ही हरित संपत्ती कडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

••• मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये आपल्या देशाच्या वातावरणामध्ये प्रचंड बदल झाला आहे तापमान हे दहा अंश सेल्सिअसणे वाढल आहे. मागील दहा पंधरा वर्षांपूर्वी हेच तापमान 37-38 सेल्सिअस एवढे असायचे. आता काही शहरांमध्ये 50 अंश सेल्सिअस येवढी तापमान वाढ नोंदवली जाणार आहे. याला कारणीभूत आहे तो फक्त स्वार्थी वृत्तीचा मनुष्य प्राणी. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेली वृक्षतोड तसेच अवैध जंगलतोड.

••• जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये चढाओढ करण्या च्या शर्यतीमध्ये देशातील पर्यावरणाचा पूर्णतः बिमोड होत आहे. नद्यांच्या गटारी झाल्या आहेत, शहरांमध्ये श्वास घेणे मुश्किल झाला आहे सर्वत्र प्रदूषणाने विळखा घातला आहे.

••• या सर्वांची प्रचिती म्हणजे विविध प्रकारची रोगराई, शेती साठी पूरक वातावरण नाही , पाऊस वेळेवर होत नाही. आत्ताच जर आपण जागे झालो नाही तर पाच वर्षानंतर मृत्यू अटळ आहे.

••• देशातील परिस्थिती बघितली तर पर्यावरण सारख्या प्रमुख मागणीवर सरकार देखील निष्क्रिय आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकार मागील वीस वर्षापासून प्लास्टिक बंदी करत आह बंदी तर रहुद्या निर्मिती मध्ये अधिक वाढ झाली आहे.. कितीतरी अवैध उद्योगधंदे आहेत त्यामधून हवेचे तसेच नद्यांचे देखील प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे तरी पण सरकारी यंत्रणा डोळे झाकून बघ्याची भूमिका घेत आहे. आणि सरकारच्या कार्यप्रणालीवर न बोललेलच बरे. सरकार कशाप्रकारे काम करत आहे हे आपण सर्वश्रुत आहोत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र पर्यावरण विभाग तसेच भारतीय हरित लवाद कशाप्रकारे काम करत आहे त्याचीच ही पोहोच 50° c तापमान.

••• विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील कोणताही पक्ष पर्यावरण विषयक धोरणावर बोलत नाही. खऱ्या अर्थाने ही निवडणूक पर्यावरणाच्या मुद्द्यावर होणं अपेक्षित आहे पण नागरिकांना जात, धर्म, समाज व्यवस्था यामध्ये व्यस्त केला आहे. निवडणुकीच्या सभेमध्ये स्टेजवर देखील कुलर बसवले जातात पण सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते आणि सभेला येणारे मूर्ख नागरिक यांनी जागृत होणं गरजेचं आहे.

••• दुसरी बाजू म्हणजे नागरिकांना देखील सदर विषयाची म्हणावा तेवढी जाणीव नाही.. मी या ठिकाणी सर्व जाती धर्मातील नागरिकांना आवाहन करतो की देव धर्म करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा निसर्ग हीच खरी आपली संस्कृती आहे आणि तोच खरा धर्म आहे आणि त्याच संवर्धन आपण करावे. पर्यावरणाचे संवर्धन केले तरच निरोगी व संपन्न जीवन होईल. आपल्या संतांनी पाचशे वर्षांपूर्वी देखील सांगितले आहे.

जागे व्हा, मृत्यू अटळ आहे!!!

  • दिगंबर काशिद, पर्यावरण मित्र

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!