4 मे – भारतीय बौद्ध महासभा स्थापना दिवस
दैनिक जागृत भारत च्या वतीने सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक मंगल कामना.
1955 मध्ये या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे “द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” ची नोंदणी केली. आज संपूर्ण देशामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे काम वायुवेगाने सुरू आहे.
बौद्ध उपासनेसाठी विहारे स्थापन करणे. धार्मिक आणि वैज्ञानिक विषयांसाठी शाळा आणि महाविद्यालये स्थापन करणे, धम्म प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्नशील राहणे, इत्यादी उद्दिष्टां वर संस्था कार्यरत आहे.
संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र भैय्यासाहेब (यशवंत) आंबेडकर हे होते तर तिसऱ्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर या होत्या. सध्या भीमराव यशवंतराव आंबेडकर हे संस्थेचे कामकाज पाहत आहेत.
“द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” च्या नोंदणीच्या वेळी, TBSI चे सदस्य होते: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (नवी दिल्ली) माधव जी. मालवणकर, एस. पिल्लई, भालचंद्र के. कबीर, भगवंत सयाजी गायकवाड, एस. डी. गायकवाड, काशीराम विश्राम सावडकर, (सर्व मुंबईचे.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत