कणकवली येथे उध्दव ठाकरे यांची जोरदार फटकेबाजी – राणे, मोदी शहा यांना ठणकावलं.
कणकवली : येथे काल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रचार सभा झाली. खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चौफेर फटकेबाजी करत उध्दव ठाकरे यांनी नारायण राणे सह मोदी शहा वर पण जबरदस्त आसूड ओढले.
आपल्या भाषणात ” राम मंदिर बांधलं हे चांगलच केलं. पण राम मंदिराबद्दल बोलण्याची तुम्हाला हिंमत होत नव्हती तेव्हा शिवसेनेनं पुढाकार घेतला. आम्ही राम मंदिराला पाठिंबा दिला” असं उद्धव ठाकरे म्हणाले. दोन वेळा तिथं जाऊनही आलो, पण तुम्ही भवानी मातेच्या मंदिरात का गेला नाही, याचं उत्तर द्या या शब्दात अमित शहा यांना सूनावल.
तुम्ही राज्यघटना बदलायला निघाला आहात, त्या घटनेचे शिल्पकार डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेशासाठी आंदोलन केले. म्हणून 22 जानेवारीला आम्ही त्या मंदिरात गेलेलो. पण बाबासाहेबांनी आंदोलन केले तेव्हा तुमचे बुरसटलेले गोमूत्रधारी विरोध करत होते,” असा टोला उद्धव यांनी लगावला.
कोकणात येऊन भाजपा नेत्यांविरुद्ध भाषण करुन दाखवा असं आव्हान नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये नारायण राणेंचा समाचार घेतला. “कुणीतरी मला धमकी दिली. आपल्याकडे मराठीत काही म्हणी आहेत. त्यापैकी एक म्हण अशी आहे की शुभ बोल रे नाऱ्या. मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो. मी येऊन उभा आहे. परत कसे जातात बघतो. तू आडवा येच, तुला गाडूनच पुढे जातो. आडवा येच तू,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर निशाणा साधला. “लाज वाटली पाहिजे. 2-3 वेळा इकडे येऊन तुला आडवा केला. माझ्या घरात येऊन उभा राहिला तिकडे तुला साफ करुन टाकला. लाज नाही, लज्जा नाही. ज्याला बाळासाहेब ठाकरेंनी गेट आउट म्हणून हाकलून दिलं होत तो आता उगाच आपला कांहीतरी बडबडतोय. म्हणून म्हटलं शुभ बोल रे नाऱ्या. आता या म्हणतील नाव मी ठेवलेलं नाही,” असा टोलाही उद्धव यांनी लगावला.
बाळासाहेबांबद्दल बोलताना काल मोदी पण म्हणाले बाळासाहेब. बाळासाहेब काय तुमच्या वर्गात होते? बाळासाहेब बाळासाहेब काय? हिंदूहृदय सम्राट म्हणा. तुम्ही हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं पाहिजे. हिंदूहृदय सम्राट बोलायला तुमची जीभ अडखळत असेल तर त्या जिभेला सरळ कसं करायचं ही माझी कोकणातीलच नाही संपूर्ण देशातील जनता जाणते,” असं उद्धव ठाकरेंनी भाषणात म्हटलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत