मतदान प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची
- जनरल निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी.
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदार संघात येत्या 7 मे 2024 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदान प्रक्रिया निर्भय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी अधिक जागरूक व दक्ष राहून आपले निवडणूक कर्तव्य बजावावे, अशा सूचना जनरल निरीक्षक परमेश्वरम बी. यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात आज निवडणूक जनरल निरीक्षक परमेश्वरम बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत सूक्ष्म निरीक्षकांची बैठक झाली. बैठकीस उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ उपस्थित होते.
यावर्षी प्रथमच भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील व 40 टक्केपेक्षा अधिक दिव्यांगत्च असलेल्या मतदारांना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या मतदारांचे मतदान होताना आणि 7 मे रोजीच्या मतदान दिवशी सूक्ष्म निरीक्षकांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी निर्भयपणे पार पाडावी अशा सूचना निवडणूक जनरल निरीक्षक परमेश्वरम बी. यांनी दिली. उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी सादरीकरणाद्वारे सूक्ष्म निरीक्षकांन माहिती दिली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत