पतंजली ला कोर्टाचा दणका -14 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द; फौजदारी तक्रार दाखल

नवी दिल्ली : सगळ्या जगाला योग शिकवत शिकवत करोडो ची उत्पादन विक्री करणाऱ्या, धार्मिक म्हणत व्यावसायिक झालेल्या पतंजली का कायद्याचा चांगलाच चाबूक बसला आहे. कोर्टाचा आदेश गांभीर्याने न घेणे, जाहिराती न थांबवणे, माफीनामा योग्य पद्धतीने प्रसारित न करणे यासारख्या बाबींवर न्यायालय मागील कांहीं दिवसांपासून पतंजली आयुर्वेद ला सूचना करत आहे पण आता मात्र बाबा रामदेव यांना उत्तराखंड सरकारने चांगलाच मोठा झटका दिला आहे. राज्य नियामकाने रामदेव यांच्या १४ फार्मा कंपन्यांचे परवाने निलंबित केले असून या उत्पादनांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती वारंवार प्रसिद्ध केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्या मुळे फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पतंजलीच्या ज्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये दिव्या फार्मसीचे दृष्टी आय ड्रॉप, स्वसारी गोल्ड, स्वसारी वटी, ब्रॉन्कॉम, स्वसारी प्रवाही, स्वसारी अवलेह, मुक्ता वती एक्स्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत, ॲडव्हान्स, लिवोग्रिट आणि आयग्रिट गोल्ड यांचा सामावेश आहे. याशिवाय योगगुरु रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांच्या विरोधात ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, रामदेव यांची FMCG कंपनी-पतंजली फूड्स लिमिटेड यांना GST इंटेलिजेंस महासंचालनालयाने (DGGI) कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. चंदीगडस्थित डीजीजीआयने २७.५ कोटी रुपयांच्या जीएसटीची मागणी केली. डीजीजीआय चंदीगडला त्यांच्या तपासणीत सात बनावट कंपन्यांनी जारी केलेल्या बनावट पावत्या लक्षात आल्या आणि या आधारावर पतंजली फूड्सने सुमारे २७.४६ कोटींचे बनावट ITC दावे केल्याचा आरोप असून कंपनीच्या प्रवक्त्याने नोटीसला दुजोरा दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत