मतदान झालेल्या ठिकाणी शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; निवडणूक आयोगाची परवानगी
पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षक पद भरतीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडथळे निर्माण झाले होते.
मात्र, निवडणूक झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्याबाबत शिक्षण विभागाने जिल्हा परिषेदला शिक्षक भरतीसंदर्भात निर्देश देण्यात येत आहे.
पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून भविष्यात कोणतीही मे.न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये, याची योग्य ती दक्षता घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही मांढरे म्हणाले.
…त्यांच्यापासून सावध राहा
शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना, तसेच प्रशासकीय कार्यपद्धती,
निर्णय प्रक्रिया अथवा नियम याची जुजबी माहिती नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यापासून सावध राहावे,
असे आवाहनही त्यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत