डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एन्जॉय करण्यासाठी नसून प्रेरित होण्यासाठी आहे ! – आयु. गणपत गायकवाड

नांदेड : आजकाल जयंतीच्या दिवशी चित्र विचित्र केश रंगवून DJ च्या तालावर चाललेला धांगड धिंगा आणि त्यातून प्रचंड प्रमाणात होणारे व्हायब्रेशन यामुळे लहान मुले, वयस्क महिला पुरुषांच्या जिवितास धोका निर्माण झाल्यामुळे त्यांना जयंतीच्या मिरवणुकीचा आनंद घेता येत नाही…DJ च्यासाठी देशभरातून होणारी करोडो रुपयाची उधळ पट्टी ही समाज हितासाठी घातक आहे. याच निधीतून अनेक समाजोपयोगी कामे करता येतील पण जयंती मंडळे एन्जॉय म्हणून सार्वजनिक निधी केवळ एक दिवस धांगड धिंगा करण्यासाठी उधळून टाकतात यापेक्षा काही समाजोपयोगी उपक्रम राबविता आलातर नव पिढीची बर्बादी रोखता येईल…
आजकाल ची गाणी ही तरुणाईच्या बरबादीचे एक कारण आहे ही गाणी समाजासमाजात तेढ निर्माण करीत असून अनेक ठिकाणी खून मारामाऱ्या होत आहेत.
शाहिराचे एक गाणे माझ्या पन्नास भाषणाच्या बरोबर आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाहीरांच्या सन्मानार्थ म्हणाले होते पण आजच्या शाहिराचं एक गाणं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हजार भाषणास मातीत मिसळवीत आहेत. त्यासाठी जयंतीत बौद्ध समाजाने पैशाचा अपव्यय टाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा होणारा अपमान टाळवा असे गोणार ता. कंधार येथे जयंती दिनी बोलताना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तर चे अध्यक्ष गणपत गायकवाड म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नांदेड येथील प्रख्ख्यात वकील एड विजयकुमार गोनारकर हे होते.? कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा, विविध सामाजिक संघटना चे पदाधिकारी, कार्यकर्ते व उपासक उपासिका उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत