निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेतून भारताचे राष्ट्रीय राजचिन्ह बदलले, एम’ नावाचा स्टँप कुणाचा ? वंचित चा संतप्त सवाल .

भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेत याआधी असलेले
भारताचे राष्ट्रीय प्रतीक ३ सिंहाच्या प्रतिमा दर्शवणारे राजचिन्हाचा वापर केला जात होता. मात्र यावेळी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतून राजचिन्हाला वगळून मोदीच्या नावाचा इंग्रजी ‘एम’ असलेला शब्द लिहिलेल्या चिन्हाचा वापर करण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी आक्षेप नोंदवून ही लोकशाहीचा गळा आवळून खून करण्याचा घाट असल्याचा आरोप केला आहे.
लोकसभा निवडणुकीचे प्रथम टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडले असून निकाल ४ जून रोजी लागणार आहे. निवडणूक आयोग निर्मिती घटनात्मक असून ती स्वायत्त यंत्रणा आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडताना याआधी राजमुद्रेचा वापर केला जात होता.निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक पार पडल्यानंतर मतदान केंद्रांवरील साहित्य संकलित करून ते ‘सिल’ करण्यात येते.
‘सिल’ करतेवेळी जो शिक्का लावायचे त्यावर राज चिन्हाचा वापर केला जात होता. वर्षांनुवर्षे हीच परंपरा कायम होती. मात्र प्रथम टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडले. यावेळी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत साहित्य ‘सिल’ करतेवेळी राजचिन्हाचा वापर थांबविण्यात आला असून त्याजागी इंग्रजीतील ‘एम’ या शब्दाचा वापर करण्यात करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे.
अधिकाऱ्याला देण्यात आलेल्या शिक्यावर राजचिन्ह ऐवजी इंग्रजीत एम शब्द लिहिलेल्या चिन्हाचा वापर करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने राज चिन्ह का बदलले आणि मोदींचे नावाचे अद्याक्षर का वापरले गेले, निवडणूक प्रक्रियेतून चक्क राज चिन्हाचा वापर निवडणूक आयोगाने कुणाचे आदेश बदलले? आयोगा स्वायत्त आहे की बटीक बनला आहे? असा संतप्त सवाल वांचितने उपस्थित केला आहे.
भारत सरकार ऐवजी मोदी सरकार वापरणारे शासकीय यंत्रणा आता थेट राजमुद्रा वर मोदीचे नावाचे वापर करून देशाचे निष्पक्ष निवडणुक यंत्रणा पक्षपाती झाल्याचे सिद्ध करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ह्याची सुमोटो दखल घेण्याची मागणी देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ते
वंचीत बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत