वसंत केशव पाटील सर हरपले


प्रा.डॉ. दिलीपकुमार कसबे
स.गा.म.कॉलेज,कराड
आदरणीय प्रा.वसंत केशव पाटील हे आमचे गुरूदेव होत .सदगुरू गाडगे महाराज कॉलेज कराड च्या महाविद्यालयात १९८४ मध्ये मी बी.ए.भाग एक मध्ये प्रवेश घेतला.या महाविद्यालयात हिंदी विषय शिकविण्याचे काम सर करत होते.पुढे १९८९ ला मी एम.ए.हिंदी पूर्ण केले. आणि सातारा या ठिकाणी बी.एड. करत असतानांच सिनियर कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून रयत शिक्षण संस्थेतील महाविद्यालयातून माझी सुरुवात झाली. म्हणजे जवळ जवळ पाच वर्षे सरांच्या कडून हिंदी विषय शिकलो. एवढेच नव्हे तर प्राध्यापक म्हणून सुद्धा सेवा बजावत असताना सरांचे मार्गदर्शन घेत राहिलो.सर हे एक स्वतंत्र चिंतक ,मराठी, हिंदी साहित्याचे लेखक होते.अत्यंत हुशार होते भाषा विषयाचे एक चांगले शिक्षक होते. ते मराठी,हिंदी,इंग्रजी,भाषांचे चांगले अभ्यासू होते. तेलगूमधील पुस्तकांचे त्यांनी अनुवाद ही केले.त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली .वाचन कसे करावे,नोट्स कशा बनवाव्यात.हे सरांच्याकडून शिकलो.त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या दशद्वार से सोपान तक या पुस्तकाचा अनुवाद ही केला. पुढे त्यांना हिंदी साहित्य अकादमी चा पुरस्कार ही मिळाला .ते चांगले साहित्यिक,कवि,कथाकार,स्पष्ट वक्ते होते.त्यांच्यामुळेच मी ही लेखन कलेत उतरलो .ते माझे चांगले गुरू होते. मला म्हणायचे ” दिलीप लिहीत जा” सरांना माझ्याविषयी खूप प्रेम होते.अधून मधून आमचे फोन व्हायचे.सुख दुख:च्या गप्पा व्हायच्या.सरांच्यामुळेच मी लिहित आहे वर्तमान पत्रातून ही अनेक लेख मी लिहिले आहेत.सरांचा मी एक आवडीचा विद्यार्थी होतो.आज सरांच्या अचानक जाण्यांने मन सुन्न झाले. गुरूच्या सावली पासून मी दुरावलो गेलो आहे.आज मला या गोष्टी चे अतिव दुःख होत आहे. कराड मध्ये असतांना सर विद्यानगर मधील जाधव वस्ती,भूपेश अपार्टमेंट मध्ये वास्तव्यास होते.एक मुलगी दोन मुले,मैडम व सर हा असा पाच लोकांचा परिवार. आई वरती सरांचे खूप प्रेम होते.त्या त्यांच्या सोबत असायाच्या मला जवळून ओळखायच्या. मी विद्यार्थी दशेत असताना त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य मला ओळखायचे.घरी गेल्यावर मैडम काही तरी खाऊ आणून द्यायच्या आणि म्हणायच्या ” दिलीप खा,नको म्हणो नकोस.” पुढे प्राध्यापक झाल्यावर सरांना, व कुटुंबाला भेटणे कमी झाले. परंतु कराडला मी बदलून आल्यावर सर एकदा कॉलेज वर आले होते .सरांना पाहून मी विभाग प्रमुखाच्या खुर्चीवरून पटकन उठलो.नतमस्तक होऊन सरांचे दर्शन घेतले.सर म्हणाले” दिलीप, खाली बस,तू या कॉलेज मध्ये हिंदी विभाग प्रमुख आहेस,मी इथे तुझ्या बाजूला च बसणार. वसंत केशव पाटील म्हणजे नावाप्रमाणे विचारांचा वसंतच होता.अनेक मराठी, हिंदी,इंग्रजी, तेलगु चे साहित्यिक त्यांना जवळून ओळखत होते.त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या अनेक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन व कार्य यावर पुस्तक ही लिहले आहे.अनेक मराठी वर्तमान पत्रातून सर लिहित होते.आमच्या महाविद्यालयातील मा.प्राचार्य डॉ. मोहन राजमाने,प्रा.आर.बी.इंगोले, डॉ. एस.आर सावंत ,डॉ. महिपती शिवदास, डॉ. सचिन जाधव,उपप्राचार्य नेताजी सुर्यवंशी,प्रा भिमाशंकर गायकवाड, डॉ. अभय पाटील, प्रा.संजय पाटील,डॉ. रमेश पोळ व अनेक सहकर्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
प्रा.डॉ. दिलीपकुमार कसबे
स.गा.म.कॉलेज,कराड
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत