संविधान बदलून पुन्हा गळ्यात मडके आणि पाठीला खराटा येऊ नये यासाठी डॉ बाबासाहेब यांनी सांगितल्यानुसार तुमची पवित्र मते विकू नका, ती सत्कारणी लावा ! – एस के भंडारे

सांगली – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 20/4/1938 रोजी इस्लामपूर येथे तुमची पवित्र मते विकू नका, सत्कारयी लावा असे अस्पृश्य व मराठा समाजाच्या जाहीर सभेमध्ये सांगितले ते संपूर्ण भाषण दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर, वाळवा तालुक्याचे भूमीपुत्र आयु. एस के भंडारे यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या भाषणाच्या 86 वा वर्धापन दिन व भव्य धम्म परिषद कार्यक्रमात बोलून दाखवले.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया वाळवा तालुका शाखेच्या वतीने इस्लामपूर येथील विजयंता अकॅडमी मैदान, रिंग रोड, डॉ आंबेडकर नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एस के भंडारे पुढे असे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना आणि आपल्या पूर्वजाना, महिलांना ज्या विषमतेच्या, गुलामीच्या यातना सहन कराव्या लागल्या मनुस्मृती, चातूरवर्ण त्यातून बाहेर काढून छत्रपती शिवराय,अहिल्याबाई होळकर महात्मा फुले, शाहू महाराज, इत्यादी समतेचे महामानव यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता, स्वाभिमान, बंधुता दिली त्याला भारतीय संविधाना च्या माध्यमातून कायदेशीर अधिष्ठान दिले. परंतु समतेचे विरोधक यांनी संविधानाला गोधडी म्हटले, राष्ट्रध्वज तीन रंगाचा असून तीन रंग अशुभ आहेत, संविधान एका अस्पृश्याने लिहिली आहे अशी संभावना करून संविधानाला विरोध केला आणि अदयाप करीत आहेत.त्या विचारसरणीचे लोक सत्तेत येऊन संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. आज शिक्षणातील आरक्षण, नोकरीतील आरक्षण संपविले जात आहे, सरकारी विभागाचे खाजगीकरण, कंत्राटीकरण केले जात आहे,समाजातील मागासवर्गीय,गोर गरीब लोकांवर, महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे त्यामुळे या संविधान विरोधकांना आता मतदान करायचे नाही असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांनी आताच्या निवडणुकीत संविधान – आरक्षण विरोधकला मतदान करू नका तर समर्थकला मतदान करावे असे आदेश दिल्याचे सांगून,संविधान बलून पुन्हा गळ्यात मडके आणि पाठीला खराटा येऊ नये म्हणून डॉ बाबासाहेब यांनी सांगितल्यानुसार तुमची पवित्र मते विकू नका, ती सत्कारणी लावा असे आवाहन केले.
एस के भंडारे यांनी पाऊस व लाईटचा व्यत्यय आला तरी आपले भाषण केले व उपस्थितांनीही उत्स्फूर्तीने ऐकले . या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी आले त्या माहितीची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगली जिल्ह्यातील पाऊल खुणा ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या ऐतिहासिक धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया,वाळवा तालुका शाखेचे अध्यक्ष जायसिंग कांबळे होते. या प्रसंगी प्रथम इस्लामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दि.20/4/1938 रोजी सभा झाली तेथे भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना एस के भंडारे यांनी पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली व धम्म परिषदेच्या ठिकाणी समता सैनिक दलाच्यावतीने एस के भंडारे यांनी ध्वजारोहण केले. दलाचे संचलन मेजर एस पी दीक्षित (कोल्हापूर ) यांनी केले. या धम्म परिषदेत पाली भाषा अभ्यासक अमित मेघावी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा सांगली पूर्व जिल्हा अध्यक्ष रुपेश तामगांवकर, सांगली पश्चिम जिल्हा अध्यक्ष रविंद्र लोंढे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सांगली पूर्व जिल्हा महिला शाखा अध्यक्ष कमलताई खांडेकर, सांगली पश्चिम जिल्हा महिला अध्यक्ष कार्तिकीताई काट्रे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्ताविक सचिन कांबळे यांनी केले.स्वागत अध्यक्ष इस्लामपूर शहर शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे होते. या प्रसंगी समाजातील प्रतिष्ठित, विविध क्षेत्रात प्रविण्य मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास वाळवा तालुका व सांगली जिल्ह्यातील इतर तालुके , सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील महिला,कार्यकर्ते आणि सांगली जिल्ह्यातील समता सैनिक दल मोठया संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत