केवळ मोदींसाठी पाठिंबा, इकडून तिकडून आलेल्यांसाठी मनसे ला गृहीत धरू नये – शालिनी ठाकरे यांनी महायुतीला ठणकावले

मुंबई : वारंवार टीका करून ऐन निर्णायक क्षणी म्हणजे निवडणूक 2024 ला मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल कार्यकर्ते तसेच मतदार संभ्रमात आहेत. वायव्य मुंबई च्या जागेसाठी सध्या ओढाताण सुरू आहे. संजय निरुपम, रवींद्र वायकर यांची नावे चर्चेत असताना यांचा प्रचार मन सैनिकांना करावा लागतो का काय हा प्रश्न पडला आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी शिंदेसेनेला चांगलंच सुनावलं आहे. ‘मनसेला धनुष्य बाण चिन्हावर लढायला सांगणार्यावर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. इकडून तिकडून पालापाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये,’ अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदेसेनेचा समाचार घेतला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत