तब्बल 25 हजार कोटींच्या महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट ?

मुंबई: भाजपा गटबांधन मध्ये सामील झाल्यावर सर्व प्रकारचे भ्रष्टाचार धुवून निघतात आणि यावी प्रचिती काल पुन्हा देशाला आली. शिखर बॅक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवारांपाठोपाठ त्यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनाही मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकांच्या माध्यमातून एमएससी बँक घोटाळा उघडकीस आला होता. याचिकाकर्त्यांनी आरोप केला की, विविध साखर कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांच्या कर्जावर थकबाकी ठेवली होती, त्यानंतर बँकांनी गिरण्या जप्त केल्या आणि लिलाव केला. यामधील अनेक गिरण्या पदाधिकारी, राजकीय नेत्यांनी घेतल्या. सन 2009-10 च्या नाबार्डच्या लेखा परीक्षण अहवालात प्रथमच शिखर बँकेतील भ्रष्टाचाराला वाचा फुटली होती. बँक नफ्यात असून बँकेची निव्वळ मालमत्ता (नेटवर्थ) वाढत असल्याचा बँकेचा दावा फेटाळून लावत, बँक तोट्यात असून नेटवर्थ उणे असल्याच्या नाबार्डच्या अहवालानंतर रिझर्व बँकेने राज्य बँकेवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश सरकारला दिले होते. सन 2009-10 च्या नाबार्डच्या लेखा परीक्षण अहवालात प्रथमच शिखर बँकेतील भ्रष्टाचाराला वाचा फुटली होती. बँक नफ्यात असून बँकेची निव्वळ मालमत्ता (नेटवर्थ) वाढत असल्याचा बँकेचा दावा फेटाळून लावत, बँक तोट्यात असून नेटवर्थ उणे असल्याच्या नाबार्डच्या अहवालानंतर रिझर्व बँकेने राज्य बँकेवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश सरकारला दिले होते.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी जय अॅग्रोटेकच्या संचालक पदाचा 2 वर्षापूर्वी म्हणजेच 2010 रोजी राजीनामा दिला. त्यानंतर सक्तवसुली संचलनालयाने अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात मनी लॉड्रींगचा ठपका ठेवत तपास सुरु केला होता. त्यामुळे या प्रकरणाशी सुनेत्रा पवार यांचा काहीही संबंध नसल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चीट देण्याची शिफारस आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाकडे सादर करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये बँकेला कोणतेही आर्थिक नुकसान झालं नसल्याचं म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत