भाजपा ला सत्तेतून नाही हटवल्यास देश उध्वस्त होईल -! शरद पवार

संविधान बदलण्याची भाषा आता उघड उघड वापरली जातेय आणि 400 पार च्या नावाखाली समर्थन मागितल जातंय हे देशाला घातक.
रायगड: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्याच्या प्रचार सभांचा धडाका सध्या सुरू आहे. काल माणगाव येथे आयोजित महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचार सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अनंत गीते, आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मोदींच्या रूपाने पुन्हा “पुतीन” तयार होतोय की काय आणि तो जर झाला हा देश योग्य रस्त्याने जाणार नाही. मोदींचे हात बळकट करा ४००च्या वरती जागा जिंका, कारण आपल्याला घटना बदलायची आहे, असे भाजपाचे लोक सांगत आहेत. जर का असे झाले तर हा देश संकटात जाईल. हा देश उद्ध्वस्त होईल त्यासाठी आपल्याला सगळ्यांना भूमिका घ्यावी लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केले. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून देशहिताची भूमिका घेऊन लोकशाही संकटात आणणार्याना सत्तेवरून घालवावे लागेल, असे मत व्यक्त केले.
आपण गेले ५६ वर्ष राज्यसभा विधानसभा लोकसभा पाहतो आहे. आजवर अनेक पंतप्रधानांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, पण आजवरचे अनेक पंतप्रधान व आताच्या पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मोदी कधी संसदेच्या कामकाजावरती विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे, असे वाटलच नाही. ज्या व्यक्तीला संसदीय पद्धतीवर विश्वास नाही, त्याच्या हातामध्ये भारताची सूत्र ठेवणे हे देशाच्या हिताचे नाही, असे पवार म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत