जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन; बिष्णोई गॅंगने केली पैशाची मागणी
मुंबई : आर्थिक राजधानी मुंबई ची कायदा सुव्यवस्था राम भरोसा असल्याचे चित्र आहे. सलमान खान च्या घराबाहेर गोळीबार केल्याची घटना ताजी असताना आता पैसे द्या अन्यथा तयार राहा असे धमकीचे फोन चालू आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आलाय. बिश्नोई गँगने फोनवरुन धमकी दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यानी दिली आहे. रोहित गोदरा नावाच्या व्यक्तीने जितेंद्र आव्हान यांना फोन केला आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पैशांची मागणी केली. रोहित गोदरा हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा असल्याची माहिती आहे. पैसे दिले नाही तर तयार राहा असा इशारा धमकी देणाऱ्याने दिल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. धमकीचा फोन ऑस्ट्रेलियावरुन आल्याची माहिती आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत