निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

हुकुमशाही पद्धतीने सरकार चालवणाऱ्या मोदींना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही – शरद पवार

छत्रपती संभाजी नगर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे जालन्याचे उमेदवार कल्याण काळे आणि औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मविआच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. मागील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला बेरोजगारी कमी करण्याचं, महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, त्यांना या गोष्टी करता आल्या नाहीत. ते म्हणाले होते, स्वयंपाकाच्या गॅसची किंमत कमी करू, पेट्रोल- डिझेलच्या किंमती ५० टक्क्यांनी कमी करू. मात्र या वस्तूंच्या किंमती कमी होण्याऐवजी वाढल्याचं आपण पाहतोय. मोदींना जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रित करता आल्या नाहीत असे ते म्हणाले.
आपल्या देशातील बेकारांची संख्या वाढली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) जगभरात सर्वेक्षण करून एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भारतात जेव्हा १०० मुलं कॉलेजमधून शिकून बाहेर पडतात, त्यापैकी ८७ मुलं बेकार आहे. म्हणजेच देशात ८७ टक्के बेकारी आहे. त्याच देशाचे प्रधानमंत्री या तरुणांचा भवितव्याचा विचार करत नसतील तर त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही.

शरद पवार म्हणाले, ज्यांनी मोदी सरकारविरोधात आवाज उठवला, जे लोक त्यांच्याबरोबर गेले नाहीत त्यांना या लोकांनी (भाजपा) तुरुंगात डांबलं आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना (अरविंद केजरीवाल) तिहार तुरुंगात टाकलं आहे. पश्चिम बंगालमधील मंत्री तुरुंगात आहेत. पंजाबमधील मंत्री तुरुंगात आहेत. लोकांचे अनेक प्रतिनिधी तुरुंगात आहेत. ही हुकूमशाही चालू आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारांना केंद्र सरकारकडून सहाय्य मिळत नाही. जे लोक यांच्या सरकारवर टीका करतील त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम केलं जात आहे. हे राज्यकर्ते आपल्या देशाला हुकूमशाहीच्या मार्गावर नेत आहेत. ती हुकूमशाही तुमची आपली लोकशाही उद्ध्वस्त करून तुमचा आणि माझा अधिकार हिरावतील. आपल्याला लोकशाहीवरील, आपल्या राज्यघटनेवरील संकट दूर करायचं आहे. यासाठी त्यांना (भाजपा) उत्तर द्यावं लागेल. त्यासाठी उद्याच्या निवडणुकीत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराभूत करणं गरजेचं आहे. या जालन्याच्या आणि औरंगाबादच्या मतदारसंघात तुम्हाला कल्याण काळे आणि चंद्रकांत खैरे यांना विजयी करावं लागेल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!