लातूर, रायगड, धाराशिव व इतर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले.
धाराशिव : उन्हाने लाही लाही झालेल्या मराठवाड्याला काल पावसाचा आनंद मिळाला. कांहीं ठिकाणीं गारा पडून वातावरण आल्हाददायक झाले. परंतु या पावसाने थांबायचे नाव न घेतल्याने त्याचे मुसळधार पावसात रूपांतर झाले. आणि अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. उमरगा, लोहारा तालुक्यात हा अवकाळ पाऊस पडला असून या पावसाने फळबागा आंबा, द्राक्ष सह शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या ज्वारी चे देखील मोठे नुकसान झाले आहे .तुळजापूर तालुक्यात ही जोरदार पाऊस झाला .जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण असून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातला आहे काही भागात गाराचा पाऊस पडला आहे. तर, काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या ज्वारी हे आता आडव्या पडल्या आहेत त्यामुळे आता ज्वारी काळी पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. महाड तालुक्यातील वरंध घाट, बिरवाडी महाड परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबा, भुईमूग, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता.
मावळात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मागील आठ दिवसापासुन उन्हाचा तडाखा आणि उष्णता जाणवत होती. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र आज संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला. अवकाळी पावसाने नागरिकांना गरमी पासून जरी दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत