महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

डॉ. आ.ह. साळुंखे एक मर्मज्ञ भाष्यकार व विवेकी विचारवंत

सक्षम समीक्षाचा साहित्य विशेषांक 22 एप्रिल 24 या सत्कार सोहळ्या निमित्ताने प्रकाशित होणार!

साहित्य आणि समाज यांचा अन्योन्य संबंध ज्ञान व्यवहाराशी आहे . हे दोन्ही संबंध जसे पुढे विकसित होतात .तसा समाज सशक्त होतो सशक्त समाज निर्माण कार्यासाठी साहित्याचे पूर्णत नाही. मात्र अंशतः योगदान मान्य केले जाते. साहित्यिक समाजाचे गतिरोध अभ्यासतो, त्याचे मनन ,चिंतन साहित्य निर्मितीच्या प्रेरणा ठरतात धर्म पुराने यामधून तो धर्म जाणिवांचा दांडोळा घेतो धर्म गोलाच्या पसाऱ्यात प्रतिकरचितांच्यासाठी जेव्हा अभ्यास केला जातो आणि संस्कृतीच्या षडयंत्राचा परदाफाष केला जातो. तेव्हा श्रद्धेय समाजाला संस्कृतीचे थोडेअंतरंग कळू लागतात. मुळात लीहण्याऱ्यांची व सांगणाऱ्यांची संस्कृती सर्व काळात तयार होत असते. ती पुढे संस्कृती आज्ञाधारकांची ही होते ती कोणी लादली हे ही विसरले जाते असे हे सांस्कृतिक संघर्षाचे.भारतीय धर्म पसार्यात हे दोन मुख्य गट कार्यरत आहेत. धर्म गोल यामध्ये शतकानुशतके आपले शोषण कोणी चालवले आहे .हे समजून न घेणारा श्रद्धांवंत,धर्म अनुयायी हा आपले सगळे परंपरागत वर्तन बरोबर मानून चालत राहतो. आपले नायक आपली पुराणे आपला इतिहास नेमकी कोणती हे समजावून न घेता तीच ओझी तशीच पुढे वाहत असतो. यामधूनच संस्कृतीचे अस्सल स्वरूप पुढे येत नाही .तिची चिकित्सा करण्याच धैर्य निर्माण होत नाही. उलट धर्म ताबेदार संस्कृतीचे चालक-मालक हे अ मानवी संस्कृती तशीच लादत समाज व्यवहार पुढे चालवतात त्यातून धर्मगोलातील समस्या प्रतिक रचिते आणि शोषित समाजाच्या नायकांचे अपहरण हे पुढे ज्ञान म्हणून मांडायला हवे अभ्यासायला हवे समाजा ची जागृती हे मांडल्याशिवाय होणार नाही. अशी सूक्ष्म जाणीव ठेवून डॉक्टर आ ह साळुंखे यांनी जो प्रचंड प्रतिकरचितांचा राजकारणाचा व्यवहार सुस्पष्टपणे महाराष्ट्र देशी मांडला आहे. त्यांच्या विवेकवादी संयत चिकित्सा मांडणीने महाराष्ट्राला आकर्षित करून घेतलेआहे. अशा या साहित्यिकाच्या समग्र साहित्य वर सक्षम समीक्षा या त्रे मासिकाने नुकताच आह साळुंखे साहित्य विशेषांक प्रकाशित केला आहे .मराठी साहित्यात साहित्यिकांचे विशेषांक ही रूढ परंपरा आहे. पण आह साळुंखे यांच्या विस्तीर्ण साहित्याचा आढावा घेणे ही मोठ्या अवघड गोष्ट आहे. सक्षम समीक्षा या त्री मासिकाचे संपादक डॉ शैलेश त्रिभुवन यांनी हे भान ठेवून समग्र साळुंखे मराठी वाचक विश्वाला वाचायला मिळावा नियोजन बध्य प्रयत्न केले आहेत.मराठी भाषेतील लेखकांनी आह ची, शैली ,चिकित्सा सूक्ष्म दृष्टीकोन ,साहित्याचे संदर्भ ,इतिहासाकडे पाहण्याचा त्यांचा नवा दृष्टिकोन, नायक आणि संस्कृती नाते त्यातील प्रभुत्व वर्गाने शोषितांचे नष्ट केलेले नायक भाषा आणि संवाद ,भाषा आणि प्रबोधन हे विषय डॉक्टर साळुंखे यांच्या लेखनातून पुढे आणण्याचा अत्यंत आनंदनीय प्रयत्न सक्षम समीक्षा या नियतकालिकातून केला आहे .याचे संपादक मंडळ व 20 लेखांचे लेखक हे सर्व अभिनंदनच पात्रठरले आहेत.

संपादक यांनी डॉक्टर साळुंखे यांचे जीवन चरित्राचा आढावा घेतला आहे विशेषतः एकूण कार्याचा विस्तृत पट मांडला आहे मराठी भाषेतील डॉक्टर आह साळुंखे यांचे संस्कृतीची चिकित्सा मनुस्मृति पासून सुरू होते इथपासून ते अनेक नायकांच्या विश्लेषणाला डॉक्टर आहोत साळुंखे यांनी नवा प्रकाशझोत पाडून लख्खपणे बहुजन संस्कृती दडपलेली जी होती ती उजेडात आणण्याचे जे काम केले आहे त्यासाठी साहित्य विशेषांक याचे प्रयोजन असल्याचे नमूद केले आहे

साहित्य विशेषण का मधील महत्त्वाचे सर्व लेख असून त्यातील डॉक्टर सुहास कुमार बोबडे कराड यांनी डॉक्टर आहे साळुंखे यांच्या ललित लेखनातील जीवनविषयक तत्त्वज्ञान या विषयाची मांडणी करताना प्रत्येक माणसाने जगताना स्वाभिमानी कसा असावा सौंदर्याचा अनुभव कसा घ्यावा अहंकारी नसावं लाचारी आणि संपत्तीचा हव्यास हा टाळायला हवा या सरळ रूपाने साळुंके यांच्या लेखनातील ललित साहित्यातून सू सूक्ष्मपणे मांडलेला विचार आपले लेखक सविस्तर उदाहरणासह चांदण्यात भिजायचे राहू नये म्हणून या साळुंखे यांच्या जीवन सौंदर्याच्या दृष्टिकोनावर सविस्तर प्रकाश टाकला आहे विवेकी विचारवंत डॉक्टर साळुंखे हे आहेत ही परंपरा तर्कनिष्ठ विचार वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे नेतच आहेत ज्योतिष भविष्य या खुळचट कल्पनेबद्दल बसलेल्या डॉक्टर साळुंखे यांची मते बोबडे नमूद करतात

सक्षम समीक्षा या अंकामध्ये महावीर जोंधळे यांनी डॉक्टर साळुंखे योगदान मांडताना साळुंके यांचा ज्ञानमळा उघडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे साळुंकीनी निवडलेले विषय निवडलेले नायक याबद्दलची अतिशय स्वतंत्र सापेक्ष आकलनाने केलेली मांडणी त्यांच्या लेखांमधून वाचावयास मिळते तिन्हीसांजेला पुन्हा पुन्हा का जायचं बांधावर निळं पाखरू पिवळ्या कळ्या कुरतडताना पाहताना मी अंधाराचा फाटका कोपरा शिवत बसलो यत्किंचितही ते नऊ होता बुद्धासारखं आकाश झेलत राहिलं असे अनेक साळुंखे यांची तरुण संवेदनेची विचार गर्भ विधाने जोंधळे यांनी मांडत आहांचा बुद्ध विचार बुद्ध तत्त्वज्ञान बुद्ध इतिहास हा सर्व त्यांच्या लेखांमधून पुढे आणला आहे संस्कृतीच्या पोटातील नायकांचे नष्टीकरण करून प्रभुत्ववाद्यांनी अत्याचार केलेले दाखवत डॉक्टर साळुंखे हे विवेकची मैत्री हा धागा पुढे कसा नेतात हे अतिशय ताकतीने एका पत्रकार संपादकाने मांडणी केली असल्यामुळे हा लेख सक्षम समीक्षा या मासिकात उच्च पातळीवरचा ठरतो

दाहक व्यथेचा एक सौम्य अविष्कार तुळशीचे लग्न एक समीक्षा हा डॉक्टर सदाशिव पाटील पुणे या त्यांच्या लेखांमध्ये शिवपुराणातील शंखचूड व तुलसी यांची कथा तसेच दैवी भागवतामधील कथासाळुंखे यांनी एकच असल्याचे जे दाखवून दिले आहे हे सांगत पुराणकार नेहमी कथा बदलतात विकृतीकरण करतात विकृती करण्याचा पर्दाफाश करणे हे डॉक्टर साळुंखे यांच्या सांस्कृतिक लेखनाचे वैशिष्ट्य आहे असे संक्षेपाने मांडलेले लेखन यावर पाटील यांनी आपले मत प्रतिपादन नोंदवले आहे

विवेकी सिद्धांत आणि आ ह. हा प्राध्यापक इंदू मती जोंधळे या लेखात डॉक्टर साळुंखे यांनी वैदिकांच्या संस्कृतीने केलेली गुन्हेगारी जी व्यापक स्वरूपात मांडली आहे सर्वनायकांच्या उदाहरण सह मांडली आहे धर्मसत्ता ही धर्म श्रद्धेच्या आधारे कशी काळी कृत्ये करते
याबाबतचा प्राध्यापक इंदुमती जोंधळे यांनी साळुंखे यांच्या लेखनातील विस्तृत उदाहरणे व संदर्भ देऊन केलेली मांडणी विवेकी सिद्धांत या लेखाच्या शीर्षाला न्याय देऊन जाते आणि साळुंखे यांचे साहित्यातील विवेकी योगदान त्यांनी दाखवून दिले आहे
डॉक्टर आहे साळुंखे महाराष्ट्राच्या विचार विश्वात चार्वाक मनुस्मृती या त्यांच्यामौलीक ग्रंथामुळे लख्खपणे पुढे आले त्याच विषयाला अधोरेखित करून डॉक्टर सुधाकर शेलार यांनी मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती या त्यांच्या पुस्तकावर अतिशय व्यापक आढावा घेऊन मांडणी केली आहे मनुस्मृतीचे संदर्भ त्यातील श्लोक यावर ही मांडणी केली आहे वैदिकांच्याअहंकाराचे मुख्य कारण वेद आहेत वेद सर्वश्रेष्ठ आहेत वेदात सर्व जगातील ज्ञान आहे ही ब्राह्मणी संस्कृतीची अज्ञानी वृत्ती यावर कठोर घनघात करणारे साळुंखे किती मोठे काम मराठी साहित्यात या विषयावर करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे

धर्मशास्त्रातील स्त्री समीक्षा या विषयावर ही जितेंद्र कदम या प्राध्यापकांनी धर्मग्रंथांनी स्त्रियांना सर्व कसे गुलामी ठेवले शिक्षण नाकारले विधवा जावयास लावले भोगदासी अशी बनवले या प्रश्नांच्याबाबत डॉक्टर अह साळुंखे त्यांच्या विविध विषयाच्या सर्व लेखना मधून महाकाव्य महाभारत यामधून स्त्रियांचा अघोरी अत्याचारी जीवन इतिहास कसा होता ?आणि आहे हे त्यांनी डॉक्टर साळुंखे यांच्या विविध पुस्तकातील इतिहास काळातील अनेक नायकांच्या निवडलेल्या चरित्र कथानकातील षडयंत्र फोलपणा आणि सांस्कृतिक गुन्हेगारी ही सगळी जी साळुंखे यांनी मांडणी केली आहे तिचा आढावा जितेंद्र कदम यांनी यात मध्ये घेतला आहे

एकूणच सक्षम समीक्षा हे त्रैमासिक डॉक्टर आहे साळुंखे यांच्या विचार विश्वाला एकत्रित मांडण्याचा प्रयत्न करते यामधून साळुंखे यांच्या जीवनभरचा लेखन संग्रह हा एकत्रित या अंकात उपलब्ध करून देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग यामध्ये यशस्वी झाला आहे
. आह साळुंखे यांचे ललित साहित्य याचा आदर्श ठरलेले पुस्तक म्हणजे चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून यावर गणपतराव ढेंबरे यांनी प्रकाशझोत टाकला आहे तुकोबाची चिंतने यावर डॉक्टर स्वप्नील इंगोले यांनी मांडणी केली आहे वर्ण वर्चस्व वादी कल्पित बखरकारांची बखर हा डॉक्टर रणधीर शिंदे यांचा लेख हा या मासिकातील सर्वोत्तम मांडणीचा इतिहास विकृतीकरण प्रस्थापित कसे करतात? .ती गुन्हेगारी विशेषता बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाचे उ दतीकरण विकृतीकरण आणि मराठी वाचक विश्वाला त्यांनी ज्या स्वप्नात ठेवले त्याबद्दल डॉक्टर साळुंखे यांनी जो सविस्तर बौद्धिक प्रयास करून पुरंदरेंना उघडे केले आहे ते सर्व इतिहासाचे त्यांचे नेरेटिव हे आहे साळुंखे यांच्या लेखनातील सबळ पुराव्याचे इतिहास साधांत लेखन किती महत्त्वाच्या आणि मोठे आहे हे रणधीर शिंदे यांनी अतिशय चांगल्या मराठी भाषेत ताकतीने मांडले आहे हयात मोहम्मद पठाण भूमिकेशी सुसंगत भाषाशैली तसेच संत तुकाराम व चार वाक यावर डॉक्टर न्यानेश्वर भोसले यांनी विशेष म्हणजे डॉक्टर माधव पूट वड यांनी साळुंखे यांच्या धर्मचिकित्से वरचा घेतलेला आढावा हा अतिशय या नियतकालिकातील माऊली ठरतो सर्वच लेख महत्त्वाचे असून सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या विषयावर डॉक्टर प्रशांत गायकवाड यांची मांडणी ही स्त्री व्यक्तिरेखा या बौद्ध साहित्यात कशा उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिल्या त्याबद्दल आह नी टाकलेला प्रकाशझोत मांडला आहे महत्त्वाचे म्हणजे इतिहासाच्या पुनरमंडणीत आह यांचे योगदान हा डॉक्टर सुचित्रा घोगरे व डॉक्टर महेश गायकवाड यांनी संकलित केलेले नवभारत मधील आहांचे लेखन हे लेख अत्यंत अभ्यासपूर्ण ठरले आहेत

सक्षम समीक्षा या मासिकाने व्यापक साहित्य ,लेखन, विषय, तत्त्वज्ञान ,इतिहासाचा धांडोळा, तत्त्वज्ञानातील नष्टीकरणाचे प्रयत्न ब्राह्मणी संस्कृती आणि वैदिक संस्कृतीची गुन्हेगारी बहुजन नायकांचे उपेक्षित स्थान या सर्व डॉ साळुंखे यांच्या सर्व पुस्तकांच्या मधील विषयांना न्याय देऊन एकूण ज्ञानदर्शनाची मांडणी करण्याचा प्रयत्न सक्षमसमीक्षा या मासिकाने केला आहे

महाराष्ट्र सह परदेशातही बौद्ध तत्त्वज्ञानावर मांडणी करणारे डॉक्टर साळुंखे यांनी उभा केलेला शिवधर्म त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर केलेली पायपीट ही विसरता येणार नाही संयत संस्कृती भाष्य करा विवेकी तत्त्वज्ञानाचा अभ्यासक मराठी भाषा धोरण ठरवणारे दृष्टे अभ्यासक हे त्यांचे योगदान स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला डॉक्टर साळुंखे यांच्या वयाच्या 81 गौरव करून ऋणाईत व्हावे वाटते .ही एक मोठी ज्ञान सभ्यता आहे .स्वामी शिक्षण संस्थेत च्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालया सातारा येथून संस्कृतचे सेवानिवृत्त प्राध्यापक म्हणून डॉ साळुंखे तथा तात्या ते महाराष्ट्र देशी अभिमानाचे आनंदाचे आदर्श ठरले आहेत.त्या एका ज्ञानवंताला संस्था 22 एप्रिल 2024 रोजी सक्षम समीक्षा मासिकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अभय कुमार साळुंखे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर डॉक्टर प्राचार्य शेजवळकर या मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करत आहे ही बाब अत्यंत ज्ञानाच्या योगदानाच्याकृतज्ञतेची ठरते आहे .याचा आनंद सातारकरांना आम्हा कार्यकर्त्यांना मनोमन होत आहे एवढेच त्यासाठीच सक्षम समीक्षेचा हा धावता आढावा घेतला आहे.

शिवाजी रोत
ॲक्टिविस्ट अँड सीनियर जर्नालिस्ट सातारा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!