सोने चांदीच्या दराला नवीन चकाकी..
सोने हा आज केवळ दागिना म्हणून राहिला नाहीतर गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. जेव्हा जागतिक स्तरावर हालचाल वाढते किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते. तेव्हा गुंतवणूकदार सोन्याच्या दिशेने धावतात. दरम्यान काही प्रमाणात रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यानंतर आता इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सोनं चांदीच्या दरवाढीवर दिसून येत आहे.
या तीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 74 हजार रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. विश्लेषकांच्या मते, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाने जागतिक स्तरावर मोठ्या हालचाली निर्माण केल्या आहेत. त्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडला आहेत.
आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 73,130 रुपये आहे. तर सराफा बाजार वेबसाइटनुसार चांदी 83,850 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत