चंद्रपूर येथे काँग्रेस उमेदवाराच्या नावावर “CANCELLED” असा शिक्का; निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी आणि सुधीर मुनगंटीवार विरूध्द जोरदार घोषणाबाजी

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील हिंदी सिटी हायस्कूल इथल्या मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केला. मतदान केंद्रावर उमेदवारांच्या यादीवर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध केला.
नेमका काँग्रेस उमेदवाराच्या नावावरच कॅन्सलचा शिक्का कसा मारला, असा सवाल करत कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. अचानक झालेल्या या गोंधळाने केंद्रावर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मतदान केंद्रावर उमेदवारांच्या यादीवर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सलचा शिका मारल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले. मतदान केंद्राच्या मुर्दाबाद मुर्दाबादच्या घोषणा देत होते. आम्ही उमेदवारी मागे घेतली नाही मग कॅन्सलच्या शिक्का का असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी विचारला आहे. हे षडयंत्र असून भाजपाचे अपयश आहे. सत्तेचा माज आहे. मतदान केंद्रावर असलेल्या अधिकारी याला जबाबदार असून त्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले पहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. ही लोकशाहीचा हत्या आहे, असे कार्यकर्ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत