कुठे कडक उन तर कुठे हलक्या सरी; मतदारांनी हवामानाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडण्याच्या सूचना.
आजपासून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान राज्यासह देशातील कांहीं मतदारसंघांमध्ये पार पडत आहे.
मतदानाच्या निमित्तानं मतदार मोठ्या संख्येनं बाहेर पडणार असले तरीही राज्यातील हवामानाचा अंदाज पाहता त्यांनी ऊन्हाच्या तडाख्यामुळं होणाऱ्या अडचणींपासून सावधगिरी बाळगतच मतदानासाठी घराबाहेर पडावं, शक्य तितकं लवकरच मतदान करावं अन्यथा सूर्य मावळतीला जाताना मतदान केंद्रांवर जावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्याच्या काही भागांमध्ये सध्या वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा समावेश आहे. इथं पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रात प्रामुख्यानं नंदुरबार, नाशिक तर, मराठवाड्यात नांदेड आणि विदर्भातील बहुतांश भागांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तिथं कोकणातील काही भागांमध्येही पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत