
“शेतकऱ्यांवर अस्मानी नाहीतर सरकारचे सुल्तानी संकट पीकविमा आणि नुकसानभरपाईसाठी ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी, तिडमागडं सरकार आहे. तीन तिघाडा काम बिघाडा सरकार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते म्हणाले की, “एकूणच महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरता आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता उद्धव ठाकरेंनी अहमदनगर दौरा केला. त्यानंतर त्यांनी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
आता पाऊस लागला तरी तो किती बरसेल, तो बरसल्यानंतर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल. पण दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके सुकून गेली आहेत. जी पिके करपून गेली आहेत, सुकून गेलेल्या पळसामध्ये दाणे भरले जाणार नाहीयत. संतापजनक गोष्ट आहे की, गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली होती त्याची नुकसनाभरपाई अद्यापही मिळालेली नाही. आता नुकसानीचे पंचनामे कधी होतील, ही नुकसान भरपाई कधी मिळेल, १ रुपयाच्या पीकविम्याचे पंचनामे कधी होणार, पैसे कधी मिळणार, कर्ज कसं फिटणार. आपण पाहतो की दर वेळेला काहीतरी होतं, तेव्हा अस्मानी नाहीतर सरकारची सुल्तानी शेतकऱ्यावर कोसळते. मधल्या काळात कांद्याने शेतकऱ्याला रडवलं. आता बोगस बियाणांचा फटका पडला आहे, पीक हाताशी येईल असं वाटत असताना वरुणाजाने पाठ फिरवली. आता तरी तो बरसत असला तरी जे नुकसान झालंय ते सरकारने तत्काळ दिलंच पाहिजे.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत