नरेंद्र मोदी भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार; भाजपा ला सत्तेचा माज आणि मस्ती – नाना पटोलेंचा घणाघात

सोलापूर: नुकत्याच एका अपघातातून बचावलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे हे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्यासाठी तसेच प्रचारा साठी गुरुवारी दुपारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांना माहिती देताना नाना पाटोळे यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली आहे. भाजपा चे इंजिन बिघडले असून आता राहुल गांधीच देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात असेही ते म्हणाले.
भ्रष्टाचाराचे सरदार म्हणजे नरेंद्र मोदी आहेत, अशी टीका नाना पाटोळे यांनी केली आहे. भाजपला सत्तेचा माज आला आहे आणि मस्ती आली आहे, असे बोलत नाना पाटोळे यांनी माध्यमांसमोर बोलताना भाजपला टार्गेट केले आहे. भाजपा ने सोलापूर साठी कांहीही केलेले नाही, पालकमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्यापेक्षा सोलापूर चा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न सोडवावा असा टोलाही त्यांनी लगावला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत