रक्तदानाने महामानवास अभिवादन
सुकांत वाघमारे
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक जयंती उत्सव मंडळ आणि कबीरा फाउंडेशन यांचा उपक्रम
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जयंती उत्सव मंडळ आणि कबीरा सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, विश्व शांती बुद्ध विहार नवीन आर टी ओ ऑफिस, सोलापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी एकुण 68 रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या रक्तदानासाठी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जयंती उत्सवाचे अध्यक्ष तेजेश गायकवाड, कबीरा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यजित वाघमोडे, , अनुप गायकवाड, सुकांत वाघमारे,आकाश वाघे,संतोष बालगाव, शशांक जाधव तसेच पुष्पराज उडानसिंह यांच्यासह मंडळाचे आणि फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत