बाबासाहेब नावाचा विशाल वृक्ष ..!
रस्त्याच्या कडेला एक झाड
त्याच्या सावलीत चार माणसं
पहिला
त्या झाडाचं पान तोडून त्यावर आपली दुःखे लिहितो.
दुसरा
अजून एका पानावर दुसऱ्यांची दुःखे लिहितो.
तिसरा
तोही एक पान तोडतो पण त्यावर काही लिहीत नाही,
फक्त न्याहाळतो.
तिघेही सुखावतात पण का ते त्यांना माहीत नसतं.
पण तिघेही पानं मात्र तिथेच सोडून जातात.
आणि चौथा
तिन्ही पानांचा पाचोळा होऊ नये ह्या काळजीने
ती आपल्या वहीत ठेवतो.
आणि झाडापुढे नतमस्तक होऊन त्याचा पाईक बनून राहतो.
तो चौथा म्हणजे मी
आणि ते झाड म्हणजे बाबासाहेब….
आणि हो!
तो मी इथे प्रत्येकजण झाला तर?
विशाल ब्रह्मानंद राजगुरु, मुंबई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत
धन्यवाद.