येडशी टोल प्लाझा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
धाराशिव : येडशी येथील irb टोल प्लाझा येथे डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात टोल प्लाझाचे मॅनेजर निशिकांत गायकवाड, राष्ट्रीय महामार्ग पोलीस निरीक्षक निशिकांत शिंदे, मेडिकल पथक अजय कांबळे,डेप्युटी मॅनेजर कदम साहेब यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पी.आय.शिंदे साहेब व मॅनेंजर गायकवाड साहेबानी समयोचित विचार मांडले व नंतर भोजन दान करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी अक्षय खोबरे, बालाजी नागटिळक, तुकाराम कदम, गणेश नलावडे, यशवंत ठावरे, अजित वीर व इतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत