भीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

दिनविशेष – 14 एप्रिल


आज दि. १४ एप्रिल २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३३, आदिच्चवारो, चेत मासो, रविवार, चैत्र माहे.*

१४ एप्रिल १८९१ – रोजी “विद्यार्थी दिवस” बोधिसत्त्व, परमपूज्य, विश्वरत्न, प्रज्ञासुर्य, महामानव, क्रांतिसूर्य, युगपुरुष, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विद्वान, शिलवान त्यागापुरूष, पिडिक उद्धारक, महापुरुष, धंम्मनिष्ठ, उत्कृष्ट संसदपटू, महासुर्य, धंम्मदीप, स्त्रिउद्धारक, अर्थतज्ज्ञ, कायदेपंडित, भारतभाग्य विधाता, साहित्यिक, दि सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. महू येथे जन्म.

१४ एप्रिल १९०८ – रोजी राजर्षी छ्त्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांकरिता मिस क्लार्क वसतिगृहाची स्थापना केली.

१४ एप्रिल १९३७ – रोजी नाशिक येथील सभेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या गौरवपर भाषणात, “माझ्या चळवळीतील शंभर नंबरी सोने.” म्हणून गौरव केला.

१४ एप्रिल १९६३ – रोजी पंडित राहुल सांस्कृत्यायन स्मृतिदिन.

१४ एप्रिल १९६६ – रोजी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली महू ते मुंबई भिमज्योत काढण्यात आली व मुंबईत पोहोचली.

१४ एप्रिल १९८४ – रोजी मान्यवर कांशिरामाजी साहेबांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली.

१४ एप्रिल १९९० – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न किताब बहाल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!