भीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!

ग्रह, तारे जर आपल भविष्य ठरवत असतील तर आपल्या बुद्धिमत्तेचा, आत्मविश्वासाचा, जिद्दीचा, मनगटाचा काय उपयोग असा प्रखर विचार मांडणारे अभ्यासू व्यक्तिमत्व!.

देशातील गोरगरीब, कष्टकरी, मागासलेल्या वर्गाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे उद्धारकर्ते!.

जो रोज थोडा थोडा मरतो, मरणाला भितो, हक्कासाठी आंदोलन करत नाही अशांसाठी सत्याग्रह, मोर्चा सारखे शांतीप्रिय अवजार उपसणारे असे खंबीर आंदोलनकर्ते!.

निश्चय लढण्याचा, सर्वांना समानतेने जगु देण्याचा, प्रत्येकाला शिक्षण प्रेमी बनवण्याचा, शिका-संघटित व्हा-संघर्ष करा याची धरणारे आस, एक तेजस्वी बाळ “”डॉ.बाबासाहेब आंबेडकर”” आले उदयास!.

हवेपेक्षा हि ज्यांचा वेग जास्त होता, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता, असा प्रज्ञासूर्य लेक जगात एकमेवच होता!.

प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रगाढ विद्वत्ता, तल्लख स्मरणशक्ती, बहुआयामी व्यक्तिमत्व, घटनाकार, कायदेपंडित, ज्ञानाचा अथांग सागर, संविधान प्रणेते, बोधिसत्व,भारतरत्न प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!