ज्ञानाचा सुर्य.. बा भीमा !

थोर तो महान, पर्वतासमान
तया भोवताली
टेकड्या ह्या सान सान
आता तो महान
गगना तो भिडे,पायथ्याचे कडे,
हे बडे बडे
माझ्या भीमाच्या किर्तीपुढे
भीम तो हवा,
नव्या मानवा मार्ग
दाखविण्या आज इथे नवा नवा
भीम तो हवा
तु झालास विर जगासाठी
तु ज्ञानाचा एक फुलवरा
तु झालास धन्य देशासाठी
तु विचारांचा चमकणारा तारा
तु दिन दलितांचा कैवारी
बा भीमा जन्म तुझा एक शिकवणं
विचार तुझे महान असे
कार्य तुझे किर्तीवंत असे
भारताला घडविले
अमृताहुनी अधिक त्या संविधानाला
बनविले
बा भीमा तुझा जन्म झाला एका विर म्हणून
झाला
योध्दा तु एक उत्तम विचारांचा झाला
तु दिप ओजस्वी, तेजस्वी
लखलखनारी ही आग
एक पहाट नवी,
उगवता सूर्य ,
तो दिवस नवा,
प्रत्येक दिवस शिकवुन दिला
व्यक्तीमत्व परिस्थिती नाही तर
स्वतः वरचा विश्वास ध्येय ठरवते.
बा भिमा तु शिकवून गेला जगण्याची कला
तु दाखवुन गेला जगण्याची दिशा
गगनाला भिडणारे विचार तुझे
आम्हा तरूणांना शिकवुन गेलास.
तु गेलास पण तुझे विचार जीवंत आहे.
तुझ्या त्या संविधानाने एकवटून
राहायला शिकवले
तु महान आहेस तुझी किर्ती महान
माझे तुला वंदन
तु ज्ञानाचे ह्रदयाचे स्पंदन..
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन..!
ऋतुजा आहिरे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत