मौजे वलगुड येथे जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन
वलगुड ता.धाराशिव येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना १३३ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.यानिमित्त सकाळी ठीक ९=०० वा. पंचशील चौकात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डाॅ.दत्ताञय गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच धुप,दिपाने करण्यात आले.यानंतर सामुहिक ञिशरण व पंचशिल घेण्यात आले.यावेळी नारी शक्तीकडुनही मोठ्या संख्येच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
तसेच जि.प. प्रा.शाळेतही जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेत विद्यार्थ्यांनी दोन तास वाचन उपक्रम राबविण्यात आला.याप्रसंगी समस्त ग्रामस्थांची उपस्थिती होती.उपस्थितांचे आभार मु.अ.पाटील सर यांनी मानले.पंचशिल चौक येथील कार्यक्रमाचे आयोजन डाॅ.बी.आर. आंबेडकर जयंती उत्सव मंडळातर्फे करण्यात आले होते.कार्यक्रमास भिमनगर येथील सर्व बौद्ध ऊपासक,उपासिका,बालक,बालिका,ग्रामस्थ,मंडळाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित सर्वांना मिठाईचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत