महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रिक्षा रॅलीद्वारे अभिवादन
उस्मानाबाद दि.१३ (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.१३ एप्रिल रोजी भीमजी ऑटो रिक्षा युनियन यांच्यावतीने शहरातून ॲटो रिक्षा रॅली काढण्यात आली. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात रिक्षा सहभागी झाले होते.
डॉ. मध्यवर्ती बस स्थानकातून या रॅलीचा शुभारंभ अण्णासाहेब गायकवाड, मोन्याभाई बोकेफोडे, गोपीशेट बनसोडे, अरुण दादा रणखांब, गौतम दादा सोनवणे,आदीसह पदाधिकारी व भीमसैनिकांच्या उपस्थितीती मध्ये करण्यात आला.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ही रॅली बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ताजमहल टॉकीज चौक, देशपांडे स्टॅन्ड, आझाद चौक, माऊली चौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस, त्रिसरण चौक, लेडीज क्लब मार्गे राजमाता जिजाऊ चौक (बार्शी नाका), माणिक चौक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, मार्गे पोलिस मुख्यालय,समता नगर, महात्मा ज्योतिबा फुले चौकात आल्यानंतर फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विजय अशोक बनसोडे यांच्या हस्ते उपस्थित पोलीस मान्यवरांचा सत्कार करून सामूहिक पंचशील घेत रॅलीचे विसर्जन करण्यात आले.
या रॅलीच्या यशस्वीतेंसाठी मार्गदर्शक विजय गवळी, संतोष कांबळे , सुरेश सररवदे,अध्यक्ष सागर सिरसाठे,उपाध्यक्ष बाळू रणखांब, कोषाध्यक्ष नंदू सोनवणे,सहसचिव धर्मा दुपारगुडे,सदस्य सचिन गंगावणे, अमोल वाघमारे, आकाश गायकवाड,विकास वाघमारे,बंटी सरोदे यांनीपरिश्रम घेतले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत