बहुजन शिक्षक महासंघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, सहसचिव डॉ. राजदत्त रासोलगिकर, दत्तात्रय शिंदे, प्रकाश साळवे, दाऊत आतार, संजयकुमार शिवशरण, नागेश सातपुते, राम गायकवाड, विठ्ठल मोरे, यशपाल आकाडे, महानंदा शिंदे, निर्मला मौळे, राजेंद्र सोरटे, महिबूब तांबोळी, इनुस बाळगी, सिद्धेश्वर भुरले, प्रिया कदम, शिवानंद चौगुले, आगतराव बनसोडे, एकोराम चौगुले, पृथ्वी शिंदे, स्वप्नजा कसबे, श्रुतिका उडाणशिव, महादेव अवताडे, अभिजीत भंडारे, नीलकंठ अय्यर, शुभम इंगळे, उपेंद्र गायकवाड, प्रकाश कांबळे, अशोक मोहरे, शुभम हिरेमठ, अनिता खडतरे, आनंद कोरे, सुनील स्वामी
आदी महासंघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
यावेळी महानगरपालिकेच्या हिरवळीवर झालेल्या अभिवादन सभेत राम गायकवाड, बोधीप्रकाश गायकवाड, अण्णासाहेब भालशंकर, युवराज भोसले,अभिजीत भंडारे, राजेंद्र सोरटे, दत्तात्रय शिंदे, नागेश सातपुते यांच्यासह इतर पदाधिकारी व सभासदांनी आपले विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले तर अशोक मोहरे यांनी आभार मानले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत