नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची करण्यात आली प्रतिष्ठापना
नळदुर्ग
समता , स्वतंत्र बंधुता आणि न्याय समानता आणि अखंडता सांगणारे विश्ववंदनीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने नळदुर्ग मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढून भीमनगर येथे प्रतिष्ठापना करण्यात आलीभारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी त्रिशरण पंचशील दिले त्याचबरोबर डॉ आंबेडकर नगर , इंदिरानगर , बुद्ध नगर , प्रतिमेचं पुजन करण्यात आले अनेक ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पुजन करण्यात आले यावेळी अमरदीप लेझीम संघाच्या खेळाडूंनी आपली कला सादर केली याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे सैनिक राजरत्न बनसोडे , योगेश सुरवसे यांनी निळ्या ध्वजाला मानवंदना दिली नळदुर्ग येथील नेते अशोक भाऊ जगदाळे यांनी ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमच पुजन केले नळदुर्ग शहरात नविन पुतळा घेऊन आल्याने या पुतळयाची मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक डॉल्बी सिस्टीम लेझीम पथका सह काढण्यात आली . हि मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक अक्कलकोट रोड , बुद्धनगर
डॉ आंबेडकर नगर , मार्गे भिमनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात ठेवण्यात आली यावेळी अनेक शहरातील सर्व नागरीक उपस्थित होते . निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण नायब सुभेदार डिंगबर बनसोडे यांनी केले
या मिरवणूकीत महिलानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत