
प्रा. संध्या वैद्य
सत्तेवर मी असते तर….
नावाला तुझ्या विरोध नसता
घटनेचा चुराडा यांनी चालवला नसता
आभाळाला ही नावं तुझे दिले असते
तुझ्या अस्मितेला हे नमले असते ||
लाथाडुन दुनिया आम्ही चित झालो
नामविस्तार तडजोडीने खुष झालो
भिकाऱ्याला निदान चतकोर वाढली
जणु अर्धवटच तुला ही श्रद्धांजली ||
चतकोर भाकरी साठी बंड झाले
सु्र्यकिरणांची झळाळी झाकत गेले
यांच्या मनालाच भोके पडलेले आहे
तुझ्या काळापासूनच धोके घडलेले आहे ||
भिक मागत जगतो हा गंजलेल्या देश
मी असते तर सागर वाढले असते
हिमालयही चरणी वाकविला असता
नावही त्याचे बाबासाहेब ठेवले असते ||
हिमालय ही भासे तुझ्या पुढे ठेंगणा
करी जो परकियांपासून आपले रक्षण
देऊन संविधान जपले माणुसकीला
अन्यायाविरुद्ध ऊभे ठाकते जन मन ।।
समतेच्या बाता मारते सरकार आता
काढलीस लिलया घरातील विषमता
वाघिणीचे दूध हरेकाला पाजलेस तू
हादरतो सह्याद्रीही डरकाळी फोडता ।।
प्रा. संध्या वैद्य
मुंबई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत